इराण - इस्रायल संघर्षात अमेरिकन तळांवर इराणचे जोरदार हल्ले; अबुधाबी, बगरीन, कतार, आणि दुबईत लाखो भारतीय पडले अडकून, दुबई येथून १११ नागरिक पुण्यात पोहोचले सुखरूप
xtreme2day
04-03-2026 20:10:25
72863701
इराण - इस्रायल संघर्षात अमेरिकन तळांवर इराणचे जोरदार हल्ले; अबुधाबी, बगरीन, कतार, आणि दुबईत लाखो भारतीय पडले अडकून, दुबई येथून १११ नागरिक पुण्यात पोहोचले सुखरूप

पुणे (विशेष प्रतिनिधी) - इराण - इस्रायल संघर्षात अमेरिकन तळांवर इराणनं जोरदार हल्ले केले आहेत. अबुधाबी, बगरीन, कतार, आणि दुबईत लाखो भारतीय अडकून पडले आहे. यात प्रामुख्याने धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या भारतीय मुस्लिमांचा समावेश आहे. त्यासोबतच विद्यार्थी आणि पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्वांना भारतात सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.
पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. यात महाराष्ट्रीयन लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. “आम्ही WhatsApp नंबर दिलेला आहे. लोक त्यावर संपर्क साधत आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरु केले आहेत. मूळामध्ये आपल्याला माहितीय की एअर इंडियाची विमानं हळूहळू त्या ठिकाणी जाऊन लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरु आहेत. जिथून आणणं शक्य आहे, तिथून आपण लोकांना आणत आहोत, कुवैतमध्ये समस्या आलेली, काही ट्रान्झिट पॅसेंजर आहेत. त्यांच्या व्हिसाच्या अडचणी होत्या. एम्बीसने प्रयत्न करुन त्यांना एका ठिकाणी थांबवलेलं आहे. त्यांना अडचण येणार नाही असा प्रयत्न आपल्यावतीने करण्यात आला आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.
संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : [email protected]/ [email protected] कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : [email protected] सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : [email protected] इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : [email protected] इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : [email protected] /[email protected] कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : [email protected] बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : [email protected]/ [email protected] जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : [email protected]/ [email protected]/ [email protected], https://x.com/i/status/2027746402575782262 नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२३३७१/२६१३३५२२/२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.