अमेरिका-इस्रायलचा इराणवर हल्ला; संघर्ष पेटला, युद्धाला सुरुवात झाल्यानं जगात चिंताजनक परिस्थिती
xtreme2day
28-02-2026 21:11:23
536082620
अमेरिका-इस्रायलचा इराणवर हल्ला; संघर्ष पेटला, युद्धाला सुरुवात झाल्यानं जगात चिंताजनक परिस्थिती

तेहरान (एजन्सी वार्ता) - इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका असा संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भारताची मोठी कोंडी झाली आहे. तिन्ही देशांशी भारताचे असलेले संबंध पाहता परिस्थिती आव्हानात्मक आहे. भारत आणि इस्रायलचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहेत. तर इराण आणि भारताची मैत्री बरीच जुनी आहे. सामरिक आणि आर्थिक बाजूंचा विचार केल्यास इराणचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धात अमेरिका इस्रालयच्या बाजूनं आहे. त्यामुळे परराष्ट्र संबंध, धोरण सांभाळताना भारतासाठी हा विषय अतिशय आव्हानात्मक आहे.
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धानं मध्य पूर्वेतील परिस्थिती चिघळली आहे. अमेरिका, इस्त्रायलनं इराणवर एअर स्ट्राईक केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणनं इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. अमेरिकेला दणका देण्यासाठी इराणनं त्यांच्या मध्य पूर्वेतील अनेक लष्करी तळांवर हल्ले चढवले आहेत. सात देशांमधील तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडींमुळे वातावरण तापलेलं असताना इराणला मोठा धक्का बसला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नसीरजादेह आणि रिवोल्यूशनरी गार्डचे कमांडर मोहम्मद पकपूर यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त रॉयटर्सनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन सुत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा रॉयटर्सनं केला आहे.
अमेरिका आणि इस्रायलनं आज (२८ जानेवारी) इराणवर संयुक्त हल्ला चढवला. गेल्या काही आठवड्यांपासूनच अमेरिकेनं यासाठीची तयारी सुरु होती. आता युद्धाला सुरुवात झाली आहे. काही देशांनी इराणला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जगात दुफळी माजण्याची चिन्हं आहेत. रशियानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. पण अद्याप तरी रशियानं युद्धात उडी घेण्याचे संकेत दिलेले नाहीत. संकटात संधी शोधणारा चीन काय करणार याकडेही जगाचं लक्ष लागलं आहे.
हे युद्ध सुरु होताच भारतानं इराण आणि इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. परिस्थितीवर नजर ठेवा. सावधान आणि सतर्क राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा, असं आवाहन भारताकडून करण्यात आलं. युद्धात उतरलेले देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भारतानं सावध पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आठवड्यात इस्रायलचा दौरा केला आहे. या दौऱ्यात अनेक संरक्षण, आर्थिक करार झाले. इस्रायलसोबतचे संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत. दुसरीकडे इराणच्या चाबहार बंदरात भारताची मोठी गुंतवणूक आहे. या बंदराचं आर्थिक आणि सामरिक महत्त्व मोठं आहे. इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका युद्धात एका देशाची बाजू घेणं भारतासाठी आव्हानात्मक आहे. गेल्या वर्षी जूनमध्येही इस्रायलनं इराणच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले होते. तेव्हा १३ जून २०२५ रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं भूमिका स्पष्ट केली होती. इराण आणि इस्रायलमधील घटना खूपच चिंताजनक असल्याचं त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं होतं.
दरम्यान, या देशांमध्ये संघर्ष झाल्यावर भारतानं कायम संतुलित भूमिका घेतली आहे. युद्ध दिर्घकाळ चालल्यास भारतावर आर्थिक दबाव वाढेल. युद्धामुळे खनिज तेलाचे दर भडकण्याची चिन्हं आहेत. भारत तब्बल ८० टक्के खनिज तेल आयात करतो. त्यात मध्य पूर्वेतून होणारी आयात मोठी आहे. त्यामुळे भारतासाठी परिस्थिती आव्हानात्मक आणि चिंताजनक आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणदेखील प्रत्युत्तर देताना दिसत आहे. इस्त्रायलने इराणच्या राजधानी असलेल्या तेहरानवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्त्रायलने इराणच्या राष्ट्रपती भवन, गुप्तचर यंत्रणेचं मुख्यालय अशा महत्त्वाच्या वास्तूंना लक्ष्य केलं. यानंतर इराणकडूनदेखील इस्त्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात प्रत्युत्तर देण्यात आलं. इराणने सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवेत, युएई, बहारीन, कतार येथील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. तसेच अमेरिकेच्या नौदल तळांनाही लक्ष्य करण्यात आले. युद्धाचा भडका उडाल्याने इराकमधील नागरीक भयभयीत झाले आहेत. हल्ल्यानंतर अनेक नागरीक घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्नात दिसल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे या युद्धामुळे इराणच्या अनेक शहरांमध्ये भयावह परिस्थिती आहे. युद्धाने प्रभावित असलेल्या अनेक भागांमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी व्हिडीओ जारी करत भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे एका विद्यार्थिनीने लाईव्ह एअरस्टाईक होत असताना व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इराण येथील भारतीय दुतावासाने आठ दिवसांपूर्वीच इराणमधील भारतीयांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. इराणमध्ये आलेल्या भारतीयांनी कोणत्याही परिस्थितीत इराण सोडावा, अशी सूचना इराण येथील भारतीय दुतावासाने दिली होती. पण अजूनही अनेक विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात परतण्यात यश आलेलं नाही. असं असताना इराण आणि इस्त्रायल यांच्यात तीव्र युद्ध भडकलं आहे.
इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानं मध्य पूर्वेतील परिस्थिती बिघडली आहे. इराणनं अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात युद्धाची घोषणा करत प्रतिहल्ले सुरु केले आहेत. इराणनं बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागली आहेत. इस्रायलवर हल्ला चढवला आहे. त्याचवेळी मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांनादेखील लक्ष्य केलं आहे. कतार, बहारिन, यूएई, सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. त्यावर इराणनं क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इस्रायल आणि अमेरिकेनं इराण विरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली आहे. या कारवाईत इराणचं नुकसान झालं आहे. इराणची सरकारी एजन्सी IRNA च्या माहितीनुसार, दक्षिण इराणच्या होर्मोजगान प्रांतातील मिनाब शहरातील एका शाळेवर अमेरिका-इस्रायलनं हवाई हल्ला केला. या हल्ल्यात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.