Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गुगल मॅप्सच्या मदतीने पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल!

xtreme2day   24-02-2026 21:40:12   2573572

पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गुगल मॅप्सच्या मदतीने पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल! 

 

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - भारतात पाचव्या स्थानावर असलेल्या पुण्याच्या वाहतूक कोंडीचे कोड पुणे पोलिसांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे पोलिसांनी वाहतूक नियोजनासाठी 'ट्रॅफिक्युअर' सॉफ्टवेअर सुरू केले असून, गुगल मॅप्सच्या मदतीने शहरातील 550 विभागांमधील वाहतुकीचे थेट नियंत्रण केले जाणार आहे. पुणेकरांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वाहतूक कोंडीत अडकण्याचा वेळ कमी होईल आणि तातडीच्या प्रसंगी पोलिसांना पर्यायी मार्ग सुचवणे सोपे जाईल. "या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपापेक्षा डेटावर आधारित निर्णय घेणे सोपे होणार आहे," असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. 'ट्रॅफिक्युअर' (Trafficure) या नवीन सॉफ्टवेअर प्रणालीमुळे पोलिसांना शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या उपक्रमासाठी गुगल मॅप्सची मदत घेण्यात आली असून, यामुळे मनुष्यबळाचा वापर अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. 

 

 

ट्रॅफिक्युअर प्रणाली केवळ माहिती देणारी नसून ती वाहतुकीचे वैज्ञानिक विश्लेषण करणारी आहे. शहरातील कोणत्या रस्त्यावर वाहतूक ठप्प आहे किंवा संथ गतीने सुरू आहे, याची रिअल टाईम माहिती पोलिसांना तत्काळ मिळेल. ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात किंवा जिथे 'बॉटलनेक' (रस्ता अरुंद झाल्यामुळे होणारी कोंडी) तयार होतो, अशा जागा हे सॉफ्टवेअर अचूकपणे शोधून काढेल. गुगल मॅप्सकडून मिळणाऱ्या लाईव्ह डेटाच्या आधारे वाहतूक पोलीस कर्मचारी कोणत्या पॉइंटवर जास्त हवे आहेत, याचे नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांना करता येईल. वाहतूक नियंत्रण अधिक सूक्ष्म पातळीवर करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहराचे 550 लहान विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या प्रणालीची 45 दिवस प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान असे दिसून आले की, शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा सरासरी वेग सुमारे 26.8 किमी प्रति तास इतका आहे. या चाचणीच्या यशानंतर पुणे पोलीस आयुक्तालयात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले असून, लवकरच याची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होणार आहे.

 

दरम्यान, जुन्या मुंबई- पुणे हायवेवरही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये आज सकाळी एक कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर असलेल्या मोरवाडी चौकातील ग्रेड सेपरेटरमध्ये आज सकाळी एक कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. ग्रेड सेपरेटरमधील बोगद्याची उंची कमी असतानाही चालकाने कंटेनर आत नेल्याने हा प्रकार घडला.

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🍆 Withdraw +1,824345 BTC. Log In >> yandex.com/poll/MHjpsbzYiRKpBEU48DzHgH?hs=0320def61bb18156e397ec09b68222d0& 🍆 25-02-2026 13:02:27

jfsvty

xtreme2day.com
🤪 Transfer 1.824370 btc. Next >> yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=0320def61bb18156e397ec09b68222d0& 🤪 01-03-2026 17:54:45

ao9c0y

xtreme2day.com
🏛️ +1.81919213888 Bitcoin Get ✨➜ 🏛️ 18-03-2026 01:12:55

pln36s

xtreme2day.com
🪙 Bitcoin Crypto Recovery Bonus Activate Now 🔴▶ telegra.ph/Blockchaincom-03-17-5?hs=0320def61bb18156e397ec09b68222d0& 🪙 19-03-2026 11:44:01

v23ii8

xtreme2day.com
💼 USDC Refund After Dump Withdraw Bonus 🔥>> telegra.ph/Compensations-03-29-3?hs=0320def61bb18156e397ec09b68222d0& 💼 02-04-2026 10:30:15

im600j

xtreme2day.com
🪙 BTC Crypto Refund Ready to Withdraw 💥➜ telegra.ph/Compensations-03-29-2?hs=0320def61bb18156e397ec09b68222d0& 🪙 04-04-2026 00:55:25

hhysov


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती