तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची मोठी झेप! 'पॅक्स सिलिका' गटात भारत सामील; एआय (AI) तंत्रज्ञान आणि दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यासाठी चीनवरील अवलंबित्व कमी होणार
xtreme2day
21-02-2026 21:22:36
674830674
तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची मोठी झेप! 'पॅक्स सिलिका' गटात भारत सामील; एआय (AI) तंत्रज्ञान आणि दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यासाठी चीनवरील अवलंबित्व कमी होणार
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि सेमीकंडक्टरच्या युगात भारताने जागतिक स्तरावर एक मोठी मुत्सद्दी आघाडी मारली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'पॅक्स सिलिका' (Pax Silica) या महत्त्वाकांक्षी गटात भारत अधिकृतपणे सामील झाला आहे. या करारामुळे जागतिक खनिज पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. 'एआय इम्पॅक्ट समिट' दरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे दूत सर्जियो गोर यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारत या गटात सामील होणारा 10 वा देश ठरला आहे.
सध्या जगातील 60 ते 70 टक्के दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यावर चीनचे नियंत्रण आहे. पॅक्स सिलिकाचा मुख्य उद्देश या खनिजांच्या पुरवठा साखळीचे (Supply Chain) विविधीकरण करणे आणि कोणत्याही एका देशावर (विशेषतः चीनवर) असलेले अवलंबित्व कमी करणे हा आहे. शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर आणि एरोस्पेस क्षेत्रात या खनिजांशिवाय उत्पादन करणे अशक्य आहे. भारताच्या समावेशामुळे या आघाडीची ताकद वाढली आहे.भारताकडे असलेले सॉफ्टवेअर कौशल्य आणि वाढती मॅन्युफॅक्चरिंग क्षमता यामुळे एआय मॉडेल्स, सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर्सच्या उभारणीत भारत या गटाचा कणा ठरू शकतो. यात स्वाक्षरी करणारे देश आहेत -भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम, इस्रायल, कतार, सिंगापूर आणि यूएई तर सहभागी झालेले देश कॅनडा, युरोपियन युनियन, नेदरलँड्स आणि तैदेश आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.