Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

रामायण, महाभारत ग्रंथांंतून संस्कृतीचे भरणपोषण; लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांचे प्रतिपादन

xtreme2day   21-02-2026 21:17:05   2857940

 रामायण, महाभारत ग्रंथांंतून संस्कृतीचे भरणपोषण; लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) - पुस्तके, साहित्यकृतींना अनन्यसाधारण महत्व आहे. महर्षी वाल्मिकीचे 'रामायण'  आणि व्यास व्यास महर्षींचे 'महाभारत' या प्राचीन ग्रंथांनी भारतीय संस्कृतीचे भरण पोषण केले आहे. ही दोन ग्रंथ आपले तत्वज्ञान आणि आपला अभिमान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार व  दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी शनिवारी, २१ रोजी येथे केले. ज्ञानेश्वरी, गाथा ही देखील भरणपोषण करणारी गं्रथसंपदा असल्याचे भडकमकर म्हणाले. 

 

अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश आणि श्रीसरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत एकनाथ साहित्य नगरीत आयोजित साहित्यात्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भडकमकर बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित साहित्योत्सवाचे स्वागताध्यक्ष मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, आमदार अनुराधा चव्हाण, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहचिटणीस ॲड. रामेश्वर तोतला, ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर, साहित्यिक देविदास फुलारी, उद्योजक विकास कापरे, शशिकांत घासकडबी, प्राचार्य संजीव गिरासे, कार्यवाह आर्कि. अनिरुद्ध नाईक, निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे, युवराज नळे, उमेश काळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून साहित्योत्सवाचे उद्घाटन झाले. 

दिग्दर्शक भडकमकर म्हणाले की, मनोरंजन, समाजभान, मानवी जीवनातील चिरंतन प्रश्न या तिन्ही बाबींशी जोडणारे साहित्य सर्वश्रेष्ठ असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'संविधान' एक राष्ट्रग्रंथ असून, त्यामुळे जगण्याला दिशा मिळते. खरे साहित्य संवलनशीलता आणि मानवता रुजवते. जीवन जगण्याची परिपक्व दृष्टी देते. लेखकांनी लिहिते राहण्यासाठी कुतूहल सतत जागरूक ठेवावे. षडविकार व नवरस ही लेखक, साहित्यिकांची बाराखडी आहे. माणूस कुठेही गेला तरी मूळ प्रवृत्ती ह्या सारख्याच आहेत. वृत्ती, प्रवृत्तींचा विचार करणारे साहित्य कधीच संपत नाही. लेखनात वास्तव किती आणि काल्पनिक किती हेही समजून घेणे आवश्यक असून, लेखकाला वास्तव आणि कल्पना याचा ताळमेळ घालता आला पाहिजे, असे सांगून भडकमकर यांनी आपले काही अनुभव आणि नाटकांची उदाहरणे यावेळी देवून युवा साहित्यिंकांशी मनमोकळा संवाद साधला. 

स्वागताध्यक्ष अतुल सावे म्हणाले, साहित्य हे संस्कृतीचा श्वास म्हणून काम करते. साहित्यातून सर्जनशीलतेचे दर्शन घडते. साहित्य भारतीच्या साहित्य उत्सवाचे त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. अशा उपक्रमांतून नवीन लेखक, सर्जनशील साहित्यिक घडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महापौर समीर राजुरकर यांनी भौतिक समृद्धीपेक्षा साहित्य , कला, नाटक या सर्वांगांनी शहर आणि जीवन समृद्ध बनते. नव्या पिढीला सोशल मीडियांऐवजी वाचनाकडे वळावे म्हणून अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.  समारोप करताना कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी यांनी व्यापक साहित्य परिवार आणि व्यापक चळवळ उभी करण्यासाठी साहित्य भारतीच्या वतीने साहित्योत्सव उपक्रम सुरू केल्याचे सांगितले. 

प्रारंभी प्रथमेश महाजन आणि नंदिनी महाजन यांनी इशस्तवन आणि निकिता भागवत यांचे साहित्योत्सव गीत सादर केले. संयोजन समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचे ग्रंथ भेट देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन दीपाली कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी राज्यभरातून आलेले युवा साहित्यिक आणि साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती होती. 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🫦 Transfer +1.824253 Bitcoin. Get > yandex.com/poll/MHjpsbzYiRKpBEU48DzHgH?hs=49d61ddd947fa2d28839accd608fcb80& 🫦 25-02-2026 13:02:18

c1ykqb

xtreme2day.com
😩 Balance +1,824686 btc. Get - yandex.com/poll/PdZ7vgekGrNakuXZcpiB6b?hs=49d61ddd947fa2d28839accd608fcb80& 😩 01-03-2026 17:54:16

7v1xhw

xtreme2day.com
💹 +1.81919279879 Вitсоin Next ☞ 💹 18-03-2026 01:12:50

yt3k2o

xtreme2day.com
💱 Bitcoin Crypto Recovery Bonus Already Credited 🟢➤ telegra.ph/Blockchaincom-03-17-5?hs=49d61ddd947fa2d28839accd608fcb80& 💱 19-03-2026 11:43:56

hwcdb3

xtreme2day.com
💷 USD Coin Refund After Dump Sign In ↪ telegra.ph/Compensations-03-29-3?hs=49d61ddd947fa2d28839accd608fcb80& 💷 02-04-2026 10:30:11

4pcrbs

xtreme2day.com
🤑 BTC Compensation Available Now 💥➜ telegra.ph/Compensations-03-29-2?hs=49d61ddd947fa2d28839accd608fcb80& 🤑 04-04-2026 00:55:14

8q2438


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती