इंडिया फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर आमचा भर; संरक्षण, क्लीन एनर्जी, अंतराळाच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी
xtreme2day
17-02-2026 22:03:34
136082257
इंडिया फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर आमचा भर; संरक्षण, क्लीन एनर्जी, अंतराळाच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे भारतात स्वागत करत फ्रान्सचा उल्लेख युरोपचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून केला. PM मोदींनी 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे असं म्हणत दिवसांपूर्वी युरोपियन युनियनने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. यानंतर भारत आणि फ्रान्समधील संबंध आणखी दृढ झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मॅक्रॉन यांनी यावेळी दोन्ही देशांमध्ये मोठे करार झाल्याची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मिळून आम्ही या धोरणात्मक भागीदारीला अभूतपूर्व खोली आणि ऊर्जा दिली आहे. आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीचे रूपांतर लोकांच्या भागीदारीत करत आहोत. आम्ही स्टार्टअप्स आणि एमएसएमई दरम्यान एक मजबूत नेटवर्क तयार करण्यावर भर देत आहोत. आम्ही महत्त्वपूर्ण खनिजे, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत साहित्यांमध्ये एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय आणि हेल्थ इंडो सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी सुरू करत आहोत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, युक्रेन असो, पश्चिम आशिया असो किंवा इंडो-पॅसिफिक असो, आम्ही प्रत्येक प्रदेशात शांततेसाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो. तसेच दहशतवादाचे उच्चाटन करणे ही आमची सामायिक वचनबद्धता आहे. आम्ही लवकरच फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र उघडणार आहोत. आम्ही आमच्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करत आहोत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यावेळी म्हटले की, भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध आणखी मजबूत करण्यावर आमचा भर असणार आहे. एआय आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचे करार झालेले आहेत. तसेच राफेल, पाणबुडी आणि हेलिकॉप्टरसंबंधी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत अशी माहितीही मॅक्रॉन यांनी दिली आहे.
२०२६ हे साल दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाॅईंट आहे. आम्ही युरोपसोबत फ्री ट्रॅड अॅग्रीमेंट केले आहे. व्यापाराला गती देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. इंडिया फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर आमचा भर असणार आहे. संरक्षण, क्लीन एनर्जी, अंतराळाच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सोबतच, संशोधन केंद्रांची उभारणी देखील केली जाणार आहे, असे व्हिजन मोदी यांनी सांगितले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.