वर्ल्ड इंटेलेक्चुअल रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 ची यादीमध्ये भारताने थेट अमेरिका, चीन यासारख्या मोठ्या देशांना टाकले मागे!
xtreme2day
05-02-2026 21:45:02
56769011
वर्ल्ड इंटेलेक्चुअल रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 ची यादीमध्ये भारताने थेट अमेरिका, चीन यासारख्या मोठ्या देशांना टाकले मागे!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाऊंडेशनमार्फत (WIF) रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताने थेट अमेरिका, चीन यासारख्या मोठ्या देशांना मागे टाकले आहे.
एखाद्या देशातील लोक पर्यावरण, जगाप्रती किती गांभीर्याने वागतात, किती जबाबादारीने वागतात याचा अभ्यास करून रिस्पॉन्सिबल नेसन्स इंडेक्स 2026 ची यादी तयार केली जाते. जे देश न्याय, करुणा, दीर्घकालीन विचार यांना प्राधान्य देतात, त्या देशांची वर्गवारी या यादीत केली जाते. रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्समध्ये (RNI) एकूण 154 देशांची तुलना करण्यात आली आहे. यात नैतिक आणि पारदर्शक शासन, सामाजकल्याण, नागरिकांचे कल्याण, पर्यावरणाचे रक्षण, आंतरराष्ट्रीय व्यवहार, जागतिक जबादारी या मुद्द्यांच्या आधारे 154 देशांची क्रमवारी ठरवली जाते.
या 154 देशांच्या यादीत भारत 16 व्या स्थानी आहे. भारताला 0.5515 गुण देण्यात आले आहेत. अमेरिकाचा याच यादीत थेट 66 वा क्रमांक आहे. तर चीनचे स्थान 68 व्या स्थानी आहे. म्हणजेच भारतातील लोक चीन, अमेरिका या देशांतील नागरिकांच्या तुलनेत अधिक जबाबदार आहेत. पाकिस्तानचे स्थान तर या यादीत थेट 90 वे आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे. या देशाला 0.6194 गुण देण्यात आले आहेत. दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.