Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यरात्रीची घोषणा; भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, गुंतवणूकदारांची 20 लाख कोटींची कमाई!

xtreme2day   03-02-2026 20:01:08   416580657

डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यरात्रीची घोषणा;  भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, गुंतवणूकदारांची 20 लाख कोटींची कमाई!

 

मुंबई (व्यापार प्रतिनिधी) - भारतीय शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. भारत अमेरिका ट्रेड डीलमुळं शेअर बाजारात तेजी कायम राहिली. डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यरात्री घोषणा केली आणि भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी  पहायला मिळाली. आज गुंतवणूकदारांची 20 लाख कोटींची कमाई झाली असल्याचे चित्र दिसून आले. 

 

 

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 फेब्रुवारीला जोरदार तेजी पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या घोषणेमुळं बाजार तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 2073 अंकांनी वाढून 83739.13 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 639 अंकांच्या तेजीसह 25727.55 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 12 मे 2025 नंतर सर्वाधिक तेजी आज पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांची मानसिकता सकारात्मक असल्यानं बाजारात खरेदीचा ट्रेंड सुरु होता. बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक 2.79 टक्क्यांनी वाढला, बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांक 2.91 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. 16 प्रमुख सेक्टोरल निर्देशांक तेजीसह बंद झाले.

 

 

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य आज 467.09 लाख कोटींवर पोहोचलं आहे. सोमवारी बीएसईचं बाजारमूल्य 455.03 लाख कोटी रुपयांवर होतं. म्हणजेच बीएसईवरील कंपन्यांचं बाजारमूल्य 12.06 लाख कोटींनी वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 12.06 लाख कोटींची वाढ झाली आहे. सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी 28 शेअर तेजीसह बंद झाले. अदानी पोर्टस, बजाज फायनान्स, इंडिगो, पॉवरग्रीड, सन फार्माच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर, टेक महिंद्रा आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. दरम्यान, आज शेअर बाजारात 4422 शेअरमध्ये ट्रेडिंग झलं. यापैकी 3299 शेअर तेजीसह बंद झाले. तर,989 शेअरमध्ये घसरण झाली आहे. 134 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. तर, 121 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 117 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती