Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

... आणि मध्यरात्री 'मदर ऑफ ऑल डीलनंतर जगातील सर्वात मोठ्या Trade Deal वर शिक्कामोर्तब झाले!

xtreme2day   03-02-2026 19:38:58   201235592

... आणि मध्यरात्री 'मदर ऑफ ऑल डीलनंतर जगातील सर्वात मोठ्या Trade Deal वर शिक्कामोर्तब झाले! 

 

 

नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी) -  सोमवारी रात्री भारतातील कोट्यवधी जनता झोपेत असताना अमेरिकेतून मोठी आनंदवार्ता समोर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले शुल्क कमी केले आणि भारतासोबत ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब झाल्याच घोषणा केली. 

 

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका लांबलचक पोस्टमध्ये भारतासोबतच्या संबंधांवर चर्चा केली आणि भारत रशियन तेल खरेदी करणार नाही या अटीवर 7% कर कपात 25% वरून 18% करण्याची ऑफर दिली. भारताने एक मोठा राजनैतिक विजय मिळवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ आकारणीवर मोठा युटर्न घेतला आहे. अमेरिकेने भारतावर लादलेला परस्पर कर 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथआउटवर एका पोस्टमध्ये भारतीय आयातींवर 7% कर कपातीची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार कराराची घोषणा केली आहे, ज्यामध्ये भारतीय आयातींवर परस्पर शुल्क 50% वरून 18% पर्यंत शुल्क कमी केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली असून दोन्ही देशांमधील कराराचे उद्योग जगताने स्वागत केले आहे. 

 

 

आज सकाळी मी भारताचे पंतप्रधान मोदींशी बोललो हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ते माझे सर्वात चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवणे यासह अनेक गोष्टींवर चर्चा केली.’ ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की पंतप्रधान मोदींनी चर्चेदरम्यान रशियन तेल खरेदी थांबवण्यास आणि अमेरिका आणि कदाचित व्हेनेझुएला येथून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शविली. यामुळे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपण्यास मदत होईल, ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला हजारो लोकं जीव गमावत आहेत. या करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट केले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की “मी आज आमचे प्रिय मित्र, राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी बोललो. ‘मेड इन इंडिया’ वस्तूंवर आता फक्त 18% कर आकारला जाईल हे ऐकून मला खूप आनंद झाला. भारतातील 1.4 अब्ज लोकांकडून राष्ट्रपती ट्रम्प यांना ही एक मोठी भेट आहे.”


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती