Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

भारतावरील आयात शुल्कात 25 टक्क्यांवरून 18 टक्के; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

xtreme2day   03-02-2026 19:34:57   65688663

भारतावरील आयात शुल्कात 25 टक्क्यांवरून 18 टक्के; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - अमेरिका आता भारतीय उत्पादनांवर चीन, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या आशियाई देशांच्या तुलनेत कमी कर 18% आकारले. आशियाईतील वरील नमूद देशांना अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात टॅरिफचा भार सहन करावा लागत असून सध्या ब्राझीलवर सर्वाधिक 50 टक्के आयात शुल्क आकारले जात आहे. त्यानंतर म्यानमार आणि लाओस 40%, चीन 37% आणि दक्षिण आफ्रिका 30% आहे. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताच्या शेजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असेल. ट्रम्प यांनी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय आयातींवर टॅरिफ कमी केल्यामुळे भारतातील उत्पादन दोन्ही शेजाऱ्यांपेक्षा स्वस्त होईल, ज्याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होणार आहे. 

 

 

 

भारत आणि अमेरिकेत गेल्या वर्षभरापासून रदखलेला व्यापार करार अखेरीस अंतिम झाला आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत मध्यरात्री घोषणा केली. अमेरिकेसोबत व्यापार करारामुळे भारताला महत्त्वपूर्ण टॅरिफ फायदे मिळाले असून अमेरिकेने शेजारील देशांच्या तुलनेत भारतावर कमी टॅरिफ लादले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरापासून रखडलेली Trade Deal अखेरीस पूर्ण झाल्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यापासून भारतीय शेअर मार्केट प्रतीक्षेत असलेल्या ट्रेड डीलबाबत अखेरीस आनंदवार्ता आली आणि ट्रम्प यांनी भारतावरील अमेरिकेच्या शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. सोशल मीडियावर ट्रम्प यांनी भारतावरील परस्पर शुल्क म्हणजे Reciprocal टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर कमी करायची घोषणा केली. 

 

 

आता अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील परस्पर शुल्क (Reciprocal Tariff) 18% पर्यंत कमी झाल्यामुळे अमेरिकेतील निर्यात वाढेल आणि Tariff चा भार कमी केल्यामुळे रत्ने आणि दागिने, आयटी सेवा आणि कापड यासह अनेक क्षेत्रांना मोठा फायदा होईल. या टॅरिफ कपातीचा सर्वात मोठा धोरणात्मक फायदा म्हणजे आता अमेरिकन बाजारात भारतीय उत्पादने चिनी उत्पादनांपेक्षा स्वस्त होतील. अमेरिका आता भारतीय उत्पादनांवर 18% कर लादले तर चीनवर अजूनही 34% टॅरिफचा भार कायम आहे. अशाप्रकारे, दोन्ही देशांवरील उत्पादनांवर अमेरिकेत लादल्या जाणाऱ्या या टॅरिफच्या फरकामुळे जागतिक खरेदीदारांना भारताकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे भारतीय कंपन्यांसाठी ऑर्डर व्हॉल्यूम आणि मार्जिनमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारतातील कपड निर्यातीचा मोठा भाग अमेरिकेवर अवलंबून असल्याने 18% पर्यंत टॅरिफ कपातीचा सर्वाधिक फायदा कापड आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला होणे अपेक्षित आहे. आता टॅरिफचा भार कमी झाल्यामुळे किमती कमी होतील ज्यामुळे अमेरिकन स्टोअरमध्ये भारतीय कपडे परवडणाऱ्या किमतीत मिळू लागतील. त्याचप्रमाणे, लहान चामडे आणि पादत्राणे निर्यातदारांना निर्यात देखील पुन्हा सुरु होऊ शकेल. 50 टक्के टॅरिफमुळे पिछाडीवर पडलेले रत्ने आणि दागिन्यांच्या क्षेत्राला देखील आता त्यांचे जुने वैभव परत मिळू लागेल.

 

 

भारतीय कोळंबी आणि फ्रोजन सीफूडसाठी अमेरिका ही एक प्रमुख बाजारपेठ आहे, त्यामुळे टॅरिफ कपातीमुळे तेथील ग्राहकांसाठी भारतीय सागरी उत्पादने स्वस्त होतील, मागणी वाढेल आणि भारतातून निर्यात वाढेल. ऑटो पार्टस आणि विशेष रसायने यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रांना देखील यूएस टॅरिफ कपातीचा मोठा फायदा मिळू शकेल. जागतिक मूळ उपकरण उत्पादकांकडून (OEM) मोठ्या ऑर्डर अपेक्षित आहेत. या क्षेत्रांमध्ये कमी इनपुट खर्च आणि चांगले मार्जिन देखील उत्पादन क्षमतेचा वापर वाढवेल. औषधनिर्माण आणि कृषी उत्पादने - जसे की चहा, कॉफी आणि मसाले यांना देखील या धोरण बदलाचा फायदा होईल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती