भारत आणि युरोपियन युनियनने मुक्त व्यापार करारावर केली स्वाक्षरी; 18 वर्षांची प्रतीक्षा संपली! अमेरिकेला धक्का!!
xtreme2day
27-01-2026 20:36:08
276083803
भारत आणि युरोपियन युनियनने मुक्त व्यापार करारावर केली स्वाक्षरी; 18 वर्षांची प्रतीक्षा संपली! अमेरिकेला धक्का!!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांनी प्रस्तावित मुक्त व्यापार करार किंवा FTAसाठी अधिकृत स्तरावरील वाटाघाटी पूर्ण केल्या असून आता या करारामुळे द्विपक्षीय व्यापार वाढेल आणि आर्थिक संबंध मजबूत होतील. बहुप्रतिक्षित India-EU मुक्त व्यापार करार हा एक अत्यंत महत्त्वाचा करार आहे ज्याला ‘सर्व करारांची जननी’ किंवा ‘मदर ऑफ ऑल... डील’ म्हटले जात आहे. दोन दशकांच्या वाटाघाटींनंतर भारत आणि युरोपियन युनियनने आज, 27 जानेवारी रोजी ऐतिहासिक व्यापार कराराची घोषणा केली आहे. 16 व्या भारत-ईयू शिखर परिषदेत ही घोषणा केली असून या महत्त्वाच्या बैठकीचे सह-अध्यक्ष युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सॅंटोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आहेत.
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी मुक्त व्यापार करार (FTA) जाहीर केला जाऊ शकतो. भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी एफटीएसाठी अधिकृत स्तरावर वाटाघाटी पूर्ण झाल्याची माहिती दिली असून मंगळवारी होणाऱ्या शिखर परिषदेत एफटीएची घोषणा होईल, अशी पूर्ण आशा आहे. या अंतर्गत अपेक्षित असलेल्या प्रमुख घोषणांमध्ये युरोपियन कार आणि वाइन तसेच भारतीय इलेक्ट्रॉनिक्स व कापडावरील दर कमी केले जाऊ शकतात. युरोपियन युनियन आणि भारताने पहिल्यांदा 2007 मध्ये मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू केलेल्या, पण महत्त्वाकांक्षेतील मतभेदांमुळे 2013 मध्ये चर्चा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जून 2022 मध्ये चर्चा पुन्हा सुरू झाल्यावर या मुक्त व्यापार करारामुळे अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी गुणात्मक बदल घडतील अशी शक्यता आहे.
व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान बदल, गंभीर तंत्रज्ञान आणि नियमांवर आधारित जागतिक सुव्यवस्था मजबूत करण्यावर शिखर परिषदेचा मुख्य भर असेल. मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देण्याबरोबरच, दोन्ही बाजू संरक्षण फ्रेमवर्क करार आणि एक धोरणात्मक अजेंडा देखील शिखर परिषदेत सादर करतील. भारत आणि युरोपियन युनियन 2004 पासून धोरणात्मक भागीदार आहेत. हा करार भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीतील एक महत्त्वाची कामगिरी असून यावरून जागतिक स्तरावर भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे आणि मोठे व्यापार करार यशस्वीपणे पार पाडण्यास सक्षम असल्याचे दिसत आहे. यामुळे भारताचे ईयूसोबतचे धोरणात्मक संबंध मजबूत होतील, जे दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचे आहेत. या करारामुळे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही चालना मिळू शकते. EU बाजारात भारतीय उत्पादनांचा प्रवेश सुलभ करेल. तसेच, ईयू कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करू शकते, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळेल. यामुळे जागतिक व्यापारात भारताला एक मजबूत खेळाडू म्हणून प्रस्थापित करण्यात मदत होईल. युरोपियन युनियनमध्ये 27 सदस्य देश आहेत. यामध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस प्रजासत्ताक, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, स्पेन, रोमानिया, स्लोव्हेन्वे, स्लोव्हेन आणि स्लोव्हेनिया यांचा समावेश आहे.
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी मीडियाला संबोधताना आपण भारताचे परदेशी नागरिक आहेत, असे म्हणून दिली. त्यांनी त्यांचा एक पासपोर्टही दाखवला आणि म्हटले की यामुळे लोकांमधील संबंध अधिक मजबूत होतील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत म्हटले, ‘PM Narendra Modi, या खास प्रसंगी आमचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. काल आम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे होण्याचा मान मिळाला.’ दरम्यान, भारत आणि युरोपियन युनियनने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराला सामायिक समृद्धीसाठी एक नवीन ब्लूप्रिंट म्हणून वर्णन केले आणि हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार असल्याचे पुढे म्हटले. दोघांमध्ये मोठे व्यावसायिक संबंध आहेत आणि गेल्या आर्थिक वर्षात आयात-निर्यात 136 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती.
या कराराचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला ‘Mother Of All Deals’ म्हटले. मंगळवारी कराराची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की ही भागीदारी जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील भागीदारीचे उदाहरण आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळी मजबूत करेल. ‘या मुक्त व्यापार करारामुळे जगभरातील व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास आणखी दृढ होईल,’ हा करार भारताच्या वाढत्या जागतिक सामर्थ्याचे प्रतीक आहे यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले. तर अँटोनियो कोस्टा म्हणाले, ‘भारताच्या क्षमता आणि विविधतेचे हे एक अतिशय प्रभावी प्रदर्शन होते. आजचा क्षण हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही आमच्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करत आहोत, जो व्यापार, सुरक्षा आणि लोकांमधील संबंधांवर लक्ष केंद्रित करतो.’
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.