xtreme2day 16-01-2026 23:21:42 9250827
पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिकेत भाजपाने अजित पवार शरद पवार गटाला चारली धूळ; निर्विवाद बहुमत घेऊन भाजप झाला कारभारी! पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाला चारीमुंड्या चित केले आहे. अजित पवारांना जोरदार दणका देत भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. महापालिकेत भाजपचे आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहीली आहे. तर काँग्रेसने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मनसेला खातं सुद्धा उघडता आले नाही. अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंचा दोन्ही प्रभागातून पराभूत झाल्या आहेत. त्यांनी दोन प्रभागातून निवडणूक लढवली होता. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दोन्ही ठिकाणी त्या पराभूत झाल्या आहेत. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच रविंद्र धंगेकर यांना पुणेकरांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यांच्या पत्नीचा आधी पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या मुलाला ही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपचे पुण्यातील प्रमुख नेते आणि ज्यांनी या अगोदरच भावी महापौर असल्याची घोषणा केली होती ते गणेश बिडकर तब्बल साडे नऊ हजाराच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांनी धंगेकरांच्या मुलाचा पराभव केला. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी त्यांच्या समोर आव्हान उभे केले होते. पण बिडकर यांनी धंगेकर यांना चितपट केले आहे. धंगेकरांसाठी दणका समजला जात आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील भाग आहे तिथे अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवला. पोलीस प्रशासनाने पूर्णता खबरदारी बाळगली. काही ठिकाणी हाय व्होल्टेज लढती आहे तिथे देखील पोलीस बंदोबस्त हा वाढविण्यात आला होता. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट भाजपला दिलेले आव्हान, कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी लावलेली ताकद, सांगलीमध्ये विशाल पाटील, विश्वजीत कदम, जयंत पाटील यांनी एकत्रित येत दिलेला विजयाचा नारा त्यामुळे आजचा निकाल अनेकार्थाने महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. या निकालामध्ये महायुती राज्यात पुन्हा एकदा वरचढ झाली. पुण्यातील दिग्गज पराभूत नेत्यांची नावे वसंत मोरे रुपेश वसंत मोरे प्रतिभा रवींद्र धंगेकर प्रणव रवींद्र धंगेकर रुपाली ठोंबरे पाटील सुभाष जगताप ( अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष) दत्तात्रय धनकवडे (माजी महापौर) आबा बागुल अश्विनी कदम