xtreme2day 14-01-2026 23:32:32 675607000
रात्रीतून 12000 आंदोलकांना इराणनने घातल्या गोळ्या; मध्य पूर्वेतील कोणत्याही देशाने आमच्याविरुद्ध अमेरिकेला मदत केल्यास त्यांच्यावर हल्ला करणार - इराणचा निर्धार तेहरान (एजन्सी वार्ता) - अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही २८ डिसेंबरपासून सुरु झालेल्या इराणमधील आंदोलनात किमान १२००० हुन अधिक आंदोलकांनी जीव गमावला आहे. ही आकडेवारी एका मानवाधिकार संघटनेनं दिली आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इराणवर हल्ल्याचे आदेश देतील, ही शक्यता बळावली आहे. दरम्यान, मध्य पूर्वेतील कोणत्याही देशाने आमच्याविरुद्ध अमेरिकेला मदत केल्यास त्यांच्यावर हल्ला करणार असा इराणचा निर्धार आहे. इराणमध्ये इंटरनेट वापराचे निर्बंध वाढत चालले आहेत. तशी आंदोलनाची धगही वाढत आहे. इराणमधील आंदोलनाचा १६ वा दिवस आहे. ८ जानेवारीपासून इंटरनेट बंद आहे. २७ प्रांतांमधील १५६ ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. १२ जानेवारीपासून इंटरनेट बंद आहे. त्यावेळी आंदोलनं केवळ १४ ठिकाणी सुरु होती. आता संपूर्ण इराण पेटल आहे. ३०० हून अधिक शहरात हे धगधग दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी इराण सैनिकही या आंदोलकांच्या बाजूला दिसून येत असले तरीही आयातुला खोमणीच्या आदेशामुळे त्यांना आंदोलकांना गोळ्या घालाव्या लागत आहेत. या सर्व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर फ्लाईट रडार २४ च्या फ्लाईट ट्रॅकिंग डेटामधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अल उदीद हवाई तळावर अमेरिकन सैन्याच्या हालचाली टिपल्या आहेत. या सगळ्या घडामोडी सुरु असताना मध्य पूर्वेत अमेरिकन सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. कतारची राजधानी दोहाच्या नैऋत्येपासून ३५ किलोमीटर अंतरावर अल उदीद हवाई तळ आहे. या तळावर अमेरिकेचे १० हजारांपेक्षा अधिक सैनिक तैनात आहेत. हा तळ या परिसरातील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळांपैकी एक आहे. इथली धावपट्टी साडे चार हजार मीटर लांब आहे. बी-५२ स्ट्रॅटेर्जिक बॉम्बर आणि वाहतूक विमानं यांच्यासारखी मोठी विमानं या ठिकाणी उतरु शकतात. इराणमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. आर्थिक परिस्थिती, सामाजिक बंधनं या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आर्थिक नुकसान होत नसल्यानं व्यापारी वर्गही आंदोलनात सहभागी झाला आहे. इराणमध्ये याआधीही सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेनं आंदोलनं केली आहेत. पण यावेळी सत्ताधाऱ्यांसह आंदोलकांवरही संकट घोंगावत आहे. ट्रम्प यांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानं इराणमधील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून इराणमध्ये तणावाची परिस्थिती आहे. तेथील दिवसेंदिवस राजकीय अस्थिरता, हिंसक निदर्शने आणि बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे, भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची सल्लागार सूचना जारी केली आहे. तेहरान येथील भारतीय दूतावासाने इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना, त्यात व्यावसायिक, विद्यार्थी, तीर्थयात्री, व्यावसायिक किंवा पर्यटक आदींचा समावेश आहे. त्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन सरकारने केले आहे.