Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

अली खामेनीच्या राजवटी विरोधात इराणमध्ये लोक रस्त्यावर; प्रचंड जाळपोळ लूटपाट, इराणमध्ये हजारो जणांना ठार केलं!

xtreme2day   10-01-2026 22:14:27   498650493

अली खामेनीच्या राजवटी विरोधात इराणमध्ये लोक रस्त्यावर; प्रचंड जाळपोळ लूटपाट, इराणमध्ये हजारो जणांना ठार केलं! 

 

तेहरान (एजन्सी वार्ता) - इराणमधली परिस्थिती चिघळत चालली आहे. देशभरात आंदोलकांनी धार्मिक नेतृत्वाविरोधात  गेल्या 14 दिवसापासूनचे आंदोलन अजून तीव्र केलं आहे. त्यामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे. गेले तेरा दिवस आंदोलकांनी जोरदार प्रदर्शन केलं. ही वाढती अशांतता लक्षात घेऊन सरकारने संपूर्ण इराणमध्ये इंटरनेट सेवा बंदी केली आहे. सुरुवातीला हे आंदोलन महागाई, बेरोजगारी आणि चलन घसरणी विरोधात होतं. पण हळू-हळू हे आंदोलन सत्ता आणि धार्मिक नेतृत्वाविरोधात प्रदर्शनामध्ये बदललं. आता हे आंदोलन फक्त तेहरानपर्यंत मर्यादीत नाही. 

 

 

इराणमध्ये परिस्थिती हातबाहेर गेली आहे. अली खामेनीच्या राजवटी विरोधात इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत.  सुमारे दीडशे हून अधिक शहरात प्रचंड जाळपोळ, लूटपाट सुरु आहे. अली खामेनीची क्रूरता जगासमोर आली आहे. 

 

तेहरानच्या एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर टाइनम मॅगजीनला सांगितलं की, राजधानी तेहराच्या सहा रुग्णालयात कमीत कमी 217  इतर शहरात मिळून हजारो आंदोलकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात बहुतांश मृत्यू हे गोळी लागल्यामुळे झाले आहेत.

 

 

इराणची राजधानी तेहरानशिवाय अलावा मशहद, कोम, इस्फ़हान, मशिरियेह,कजविन, बुशहर, वज्द या शहरातही हिंसक विरोध प्रदर्शनं सुरु आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर जाळपोळही केली. त्यामुळेच आंदोलनाला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण इराणमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलन सुरु होऊन 14 दिवस झालेत. यात आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत. इराणमध्ये वेगवेगळ्या भागात जवळपास 400 ठिकाणी आंदोलन सुरु आहे. प्रदर्शनादरम्यान हिंसक झडपा झाल्या. त्यात एकट्या तेहरानमध्ये 217 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.  सैन्याचे जवान मारले गेले. पोलिसांनी आतापर्यंत 2300 लोकांना ताब्यात घेतलं आहे. 

 

 

इराणच्या 20 प्रांतांमध्ये ही बंडाची आग पसरली आहे. 110 पेक्षा जास्त शहरात मोठ्या प्रमाणात प्रदर्शन सुरु आहे. रुग्णालयात तोडफोडीचे अनेक प्रकार समोर आलेत. आंदोलकांनी IRGC कॅम्पवर हल्ला केलेला. त्याशिवाय तेहरानमध्ये 26 बँक लुटीच्या घटना घडल्या आहेत. 25 मशि‍दीमध्ये आगी लावण्याचे प्रकार घडले. 10 सरकारी इमारती जळून खाक झाल्या आहेत. 24 अपार्टमेन्टचं नुकसान झालं आहे. 48 फायर ब्रिगेडच्या गाड्या जाळल्या. 42 बसेसना आगी लावल्या. कॉलेज, यूनवर्सिटी बंद आहेत. संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद झाली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये या हिंसाचारामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एका रुग्णालयाचं नुकसान झालं आहे. दोन मेडिकल सेंटर, 26 बँका लुटल्या आहेत. 25 मशि‍दींमध्ये आगी लावण्यात आल्या. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स मिलिशिया बसीजच्या हेडक्वार्टरवर हल्ला झाला आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम राजधानीत झालेल्या नुकसानीला दुरुस्त करत आहेत” असं तेहरानचे महापौर अलीरेज़ा ज़कानी यांनी सांगितलं. दंगलखोरांनी सरकारी इमारती, 48 फायट ट्रक्स, 42 बस आणि रुग्णवाहिका, सोबतच 24 अपार्टमेन्टच नुकसान केलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती