Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

xtreme2day   05-01-2026 18:06:15   798350412

आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

 

 

  भोपाळ (विशेष प्रतिनिधी) - जेव्हा समाज सभ्यतेचे गोडवे गातो. तेव्हा त्यात महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. पुरुष आणि महिला हे दोन्ही मिळून समाजाला पुढे नेतात. त्यामुळे दोघांनी सजग राहणे आणि जागरुक राहणे आवश्यक असल्याचे भागवत म्हणाले. पश्चिम समाजातील स्त्रीयांची स्थिती आणि भारतीय मातृत्व केंद्रीत समाज याची तुलना करत यामुळे भारतीय संस्कृती उंच स्थानी असल्याचे भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी लव्ह जिहादवर त्रिसूत्रीची माहिती देत त्याचा वापर करण्याचे समाजाला आवाहन केले.

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लव्ह जिहादवर भाष्य केले आहे. कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहाद सारख्या घटना थांबवू शकतात, असे सरसंघचालक म्हणाले. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा अशा घटनांवर अंकुश लागले. मुलांच्या भावना समजून घेता येतील. त्यामुळे या घटनांना आळा बसेल असे भागवत म्हणाले. भोपाळ येथील शिवनेरी भवन येथ आयोजित स्त्री शक्ती संवाद या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी याविषयावरआपली मत स्पष्ट केली. 

 

 

आपल्याला हे समजून घ्यायला हवे की अनोळखी व्यक्ती आपल्या मुलीला कसा भलवू शकतो? कुटुंबातील विसंवाद, सदस्यांमधील संवादातील कमी याचे या प्रकरणात मोठे योगदान आहे. जेव्हा कुटुंबात नियमित संवाद होईल. तुम्ही मुलांशी संवाद साधला तर त्यांना धर्म, संस्कृती आणि पंरपरांची माहिती होईल, त्यांच्याविषयीचा स्वाभाविक सन्मान समोर येईल.यावेळी त्यांनी लव्ह जिहाद थोपवण्यासाठी त्रिसूत्री सुद्धा सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली. त्यांनी यावेळी त्रिसूत्री सांगितली. कुटुंबात नियमित संवाद, मुलींमध्ये सजगता आणि आत्मसुरक्षेची भावना निर्माण करणे आणि लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणे या त्रिसूत्रींवर त्यांनी जोर दिला. सामाजिक संघटनांवर ही त्यांनी जबाबदारी निश्चित केली. अशा कोणत्याही घटनांबाबत सामाजिक संघटनांनी सजग राहावे. अशा घटनांविरोधात समाजाने एकत्रित येऊन विरोध करावा, तेव्हाच लव्ह जिहादवर समाधानकारक तोडगा निघेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती