xtreme2day 03-01-2026 17:50:01 93728383
शंभर मुलाचा बाप असलेला अब्जाधीश पॉवेल डुरोवसोबतची डीएनए कनेक्शन सिद्ध करा; संपत्तीत वाटा मिळवा दुबई (वार्ता) - जगातल्या याच श्रीमंत माणसाने एक अजब घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पॉवेल डुरोवच्या स्पर्म डोनेशनमुळे जन्माला आलेल्या मुलांनाही त्याच्या संपत्तीचा हिस्सा मिळणार आहे. आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पॉवेल डुरोवने तरुण पणात स्पर्म डोनेशन केलं होतं. त्याच्या स्पर्म डोनेशनमधून किमान शंभर एक मुलं जगभरात जन्माला आली असतील, असा त्याचा दावा आहे. या मुलांना त्याच्या संपत्तीमध्ये हिस्सा देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी पॉवेल डुरोव हे एक नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती 17 अब्ज आहे. तर त्यांचे सध्याचे वय 41 वर्ष आहे. त्यांची पर्सनालिटी म्हणाल तर लाखो मुली याच्यावर फिदा होतील. जगातल्या याच श्रीमंत माणसाने ही अजब घोषणा केली आहे. संपत्तीचा हिस्सा मिळण्याआधी त्याने एकच अट ठेवली आहे. दावा करणाऱ्या मुलांसोबत त्याचं डिएनए कनेक्शन असलं पाहिजे. पॉवेलच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मॅसेजचा पूर आला आहे.हजारो तरुण-तरुणी तोच आपला बाप आहे अशा आशयाच्या पोस्ट शेअर करत आहेत. पण पॉवेल डुरोवसोबतची डीएनए कनेक्शन या मुलांना सिद्ध करता येईल का? असा प्रश्न आहे. स्पर्म डोनेशनची प्रक्रिया कशी राबवली जाते ते समजून घेऊयात. स्पर्म देताना ते हेल्दी असले पाहीजे. ते तपासल्यानंतर स्पर्म घेतले जातात. त्यानंतर ते गरजूंना दिले जाते. शिवाय त्याचे रेकॉर्ड ठेवले जाते. पण डोनरला त्याची कल्पना नसते. डोनरच्या स्पर्मचे अनेक अशं ही बनवले जातात. ते ही डोनेट केले जातात. तसतं पॉवेल यांनी ही केलं होतं. पॉवेल डुरोव हा टेलिग्रामचा संस्थापक आहे. तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 120 व्या स्थानावर येतो. त्याची एकूण संपत्ती 17 अब्ज इतकी आहे. पॉवेल डुरोव हा मूळचा रशियाचा नागरिक आहे. मात्र गेल्या 12 वर्षांपासून तो दुबईत वास्तव्य करतो. 2014 मध्ये पॉवेलला रशिया सोडून दुबईला स्थलांतरित व्हावं लागलं होतं. रशियन सरकारच्या दबावामुळे त्याला देश सोडावा लागला. 2006 मध्ये पॉवेल डुरोव आणि त्याच्या भाऊ निकोलाई यांनी मिळून VK म्हणजेच VKONTAKTE नावाचं सोशल मीडिया अॅप स्थापना केली. फेसबूकप्रमाणेच व्हीके हे रशियाचं सर्वात मोठं सोशल मीडिया नेटवर्क बनलं. पुढे रशियन सरकारने सोशल मीडिया अॅपचा डेटावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे रशियन सरकारविरुद्ध पॉवेल डुरोवचा संघर्ष वाढला होता. अखेर 2014 मध्ये पॉवेलने व्हीके मधून आपला हिस्सा विकला आणि दुबईला स्थलांतर केलं. यापूर्वी 2013 मध्ये पॉवेलने टेलिग्रामची स्थापना केली. टेलिग्राम हेदेखील जगातील सर्वाधिक जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया अॅप्सपैकी एक मानलं जातं.पॉवेल डुरोव दुबईमध्ये असला तरीही रशियाचं सरकार आजही त्याच्या मागावर आहे. दोन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अटक झाल्यामुळेही पॉवेल चर्चेत आला होता. 2024 मध्ये पॅरिसमधील विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. पॉवेलवर ड्रग्ज तस्करी, मनी लॉन्डिंग, टेलिग्रामवर बाललैंगिक शोषणासंबंधित आरोपांखाली अटक करण्यात आली. याप्रकरणात त्याला जामीन मिळाला. मात्र फ्रान्स सोडण्याची परवानगी नव्हती. मार्च 2025मध्ये त्याला फ्रान्स सोडण्याची परवानगी मिळाली. तो पुन्हा दुबईमध्ये परतला. यानंतर आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय. आता त्याला आपल्या स्पर्ममधून जन्माला आलेल्या मुलांचा त्याला शोध घ्यायचा आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा वाटाही तो देणार आहे. आता खरचं पॉवेल डुरोवचे वारसदार त्याला मिळतील का? या प्रश्नाचे उत्तर काळच ठरवेल असे वाटते.