2026 सालाबद्दल अनेक भविष्यवेत्त्यांनी केली भाकिते; तिसरं महायुद्ध, पुतिन यांचे अध:पतन, महामारी, जगाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे बदलणार
xtreme2day
01-01-2026 20:52:51
294068724
2026 सालाबद्दल अनेक भविष्यवेत्त्यांनी केली भाकिते; तिसरं महायुद्ध, पुतिन यांचे अध:पतन, महामारी, जगाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे बदलणार

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - नाटो NATO आणि रशिया यांच्यात थेट लष्करी संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली आहे. हा संघर्ष जगासाठी खूप गंभीर ठरू शकतो. सलोम यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या बदलांचीही भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या सर्वात धाडसी दाव्यांपैकी एक म्हणजे, BRICS (ब्राझील, रशिया, भारत , चीन आणि दक्षिण आफ्रिका) हा मोठा गट अमेरिकन डॉलरपासून दूर जाऊ शकतो. यामुळे जगाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे बदलू शकते, असे लाईव्ह नास्त्रेदमस' म्हणून ओळखले जाणारे ब्राझीलचे भविष्यकार एथोस सलोम यांनी 2026 या वर्षासाठी भाकीत केले आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असेल, याचा विचार करत आहेत. पण यासोबतच, जगभरातील भविष्यवेत्त्यांनी 2026 सालासाठी केलेल्या भविष्यवाण्यांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. यात बुल्गारियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा आणि फ्रान्सचे भविष्यवेत्ते नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांचा समावेश आहे. यापैकी काही भविष्यवाण्या तर खूपच चिंताजनक आहेत.
बाबा वेंगा यांनी 2026 सालच्या आर्थिक व्यवस्थेबाबत भविष्यवाणी करून ठेवली आहे. या भविष्यवाणीनुसार 2026 साली जगात आर्थिक मंदी येऊ शकते. तसेच जगाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो. या आर्थिक मंदीमुळे ज्या देशांची अर्थव्यवस्था नाजूक आहे, त्या देशांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोबतच एआयचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे. 2026 साली एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या एआयच्या ताकदीला माणूस नियंत्रित करू शणार नाही. मशिनींचा प्रभाव वाढेल. त्याची माणसाला अडचण निर्माण होऊ शकते, असे भाकित बाबा वेंगाने करून ठेवले आहे. तसेच
या वर्षी अनेक नैसर्गिक संकटं येणार असल्याचंही भाकित केलं आहे. यामध्ये ज्वालामुखी, ढगफुटी, भूकंप, जलवायू परविर्तन अशा अनेक संकटांचा उल्लेक आहे. या संकटामुळे पृथ्वीवरची साधारण सात ते आठ टक्के जमीन प्रभावित होऊ शकते, असे भाकित बाबा वेंगाने केले आहे.
बाबा वेंगांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत, त्यांनी 2026 मध्ये एका मोठ्या जागतिक संघर्षाची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या मोठ्या महासत्ता हळूहळू या युद्धात ओढल्या जातील. हे युद्ध जगासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
बाबा वेंगा यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलही एक भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की रशियातील प्रमुखाचा प्रभाव कमी होईल आणि त्यानंतर एक नवीन, शक्तिशाली नेता किंवा 'मास्टर' उदयास येईल. हा नवीन नेता जागतिक राजकारणात मोठे बदल घडवून आणू शकतो, असेही त्यांनी म्हटले होते.
बाबा वेंगा यांनी नैसर्गिक आपत्त्यांबद्दलही इशारा दिला होता. त्यांच्या मते, 2026 मध्ये मोठे भूकंप, त्सुनामी, पूर आणि ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. या आपत्ती सत्रामुळे पृथ्वीवरील 8 ते 10 टक्के जमीन प्रभावित होऊ शकते, ज्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
याशिवाय, बाबा वेंगा यांनी एलियन (परग्रहावरील जीव) पृथ्वीच्या संपर्कात येण्याची शक्यताही वर्तवली होती. ही भविष्यवाणी इंटरस्टेलर कॉमेट 3I/ATLAS या धूमकेतूशी संबंधित असू शकते, जो पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे. कदाचित या धूमकेतूमुळे एलियन्स पृथ्वीवर येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ते नास्त्रेदमस यांच्याबद्दल. त्यांच्या भविष्यवाण्याही 2026 साठी चर्चेत आहेत. नास्त्रेदमस यांनी सात महिने चालणाऱ्या एका भयंकर युद्धाची भविष्यवाणी केली आहे. या युद्धात खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि दुःख असेल, असे त्यांनी म्हटले आहे
नास्त्रेदमस यांनी अजून एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, एखाद्या प्रसिद्ध किंवा शक्तिशाली व्यक्तीवर वीज कोसळेल. त्यांनी या व्यक्तीला 'महान माणूस' असे म्हटले आहे.
नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांमध्ये एक विचित्र गोष्ट म्हणजे मधमाशांच्या मोठ्या थव्याचा उल्लेख. असे मानले जाते की त्यांनी मधमाशांच्या थव्याद्वारे एखाद्या रहस्यमय आजाराकडे किंवा महामारीकडे इशारा केला आहे. ही भविष्यवाणी सध्याच्या काळात खूपच चिंताजनक वाटू शकते.
नास्त्रेदमस यांनी आणखी एक भीतीदायक चित्र रेखाटले आहे. त्यांनी स्वित्झर्लंडच्या काही भागांमध्ये रक्ताच्या पुराची भविष्यवाणी केली आहे. या भविष्यवाणीचा अर्थ असा लावला जातो की मोठ्या संघर्षांदरम्यान शांतताप्रिय भागांमध्येही हिंसाचार पसरू शकतो.
फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ते नास्त्रेदमस यांच्याबद्दल. त्यांच्या भविष्यवाण्याही 2026 साठी चर्चेत आहेत. नास्त्रेदमस यांनी सात महिने चालणाऱ्या एका भयंकर युद्धाची भविष्यवाणी केली आहे. या युद्धात खूप मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि दुःख असेल, असे त्यांनी म्हटले आहे. नास्त्रेदमस यांनी अजून एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, एखाद्या प्रसिद्ध किंवा शक्तिशाली व्यक्तीवर वीज कोसळेल. त्यांनी या व्यक्तीला 'महान माणूस' असे म्हटले आहे.
नास्त्रेदमस यांच्या भविष्यवाण्यांमध्ये एक विचित्र गोष्ट म्हणजे मधमाशांच्या मोठ्या थव्याचा उल्लेख. असे मानले जाते की त्यांनी मधमाशांच्या थव्याद्वारे एखाद्या रहस्यमय आजाराकडे किंवा महामारीकडे इशारा केला आहे. ही भविष्यवाणी सध्याच्या काळात खूपच चिंताजनक वाटू शकते. नास्त्रेदमस यांनी आणखी एक भीतीदायक चित्र रेखाटले आहे. त्यांनी स्वित्झर्लंडच्या काही भागांमध्ये रक्ताच्या पुराची भविष्यवाणी केली आहे. या भविष्यवाणीचा अर्थ असा लावला जातो की मोठ्या संघर्षांदरम्यान शांतताप्रिय भागांमध्येही हिंसाचार पसरू शकतो.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.