Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला; ५ सर्वात श्रीमंत मुंबई दिल्ली कोलकत्ता व बंगळूरू या शहरांनी जीडीपीच्या ४.१८ ट्रिलियन डॉलर्सच्या वाढीमुळे झाले शक्य!

xtreme2day   31-12-2025 16:46:44   658095401

भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला; ५ सर्वात श्रीमंत  मुंबई दिल्ली कोलकत्ता व बंगळूरू या शहरांनी जीडीपीच्या ४.१८ ट्रिलियन डॉलर्सच्या वाढीमुळे झाले शक्य!

 

(संजयकुमार जोशी  याजकडून) 

 

नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक मोठी आणि खळबळ जनक बातमी हाती आली आहे भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोचली आहे.२०२५ मध्ये भारताच्या जलद आर्थिक विस्तारामुळे देशाची महानगरीय क्षेत्र वाढ, नवोपक्रम आणि गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी आली आहेत. ५ सर्वात श्रीमंत मुंबई, दिल्ली, कोलकत्ता व बंगळूरू या शहरांनी जीडीपीच्या ४.१८ ट्रिलियन डॉलर्सच्या वाढीमुळे  शक्य झाले आहे. 

 

 

केंद्र सरकारने मंगळवार, ३० डिसेंबर रोजी जाहीर केले की भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे, ज्याचा अंदाजे आकार $४.१८ ट्रिलियन इतका आहे. "४.१८ ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (जीडीपी) भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे, आणि २०३० पर्यंत ७.३ ट्रिलियन डॉलर्सच्या अंदाजित जीडीपीसह पुढील २.५ ते ३ वर्षांत जर्मनीला तिसऱ्या क्रमांकावरून हटवण्यास आम्ही आजपासून सज्ज आहोत," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

 

 

 २०२५ मध्ये भारताच्या वेगवान आर्थिक विस्तारामुळे, देशाची महानगरीय क्षेत्रे वाढ, नावीन्य आणि गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी आली आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता व बंगळूरू ही शहरे केवळ लोकसंख्येची केंद्रेच नाहीत, तर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) महत्त्वपूर्ण वाटा चालवणारी इंजिने देखील आहेत. प्रस्थापित आर्थिक राजधान्यांपासून ते तंत्रज्ञान-आधारित शहरी केंद्रांपर्यंत, भारतातील सर्वात श्रीमंत शहरे देशाच्या आर्थिक प्रगतीची विविधता आणि व्याप्ती दर्शवतात.

 

 

मुंबई: भारताचा आर्थिक कणा

 

मुंबईने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, सुमारे २५.७३ लाख कोटी रुपये (३१० अब्ज डॉलर्स) अंदाजित सकल देशांतर्गत उत्पादनासह (GDP) देशातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून उदयास आले आहे. अनेकदा भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या प्रमुख संस्था, तसेच अनेक मोठ्या उद्योगसमूहांची मुख्यालये आहेत. त्याचे किनारी स्थान, मजबूत पायाभूत सुविधा आणि सखोल भांडवली बाजार देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणुकीला आकर्षित करत आहेत. व्यवसायाव्यतिरिक्त, बॉलिवूड आणि प्रतिष्ठित वास्तूंमुळे वाढलेले शहराचे सांस्कृतिक महत्त्व त्याच्या जागतिक प्रतिष्ठेत भर घालते.

 

 

दिल्ली एनसीआर: विकासाला गती देणारे क्षेत्र

 

त्यानंतर लगेचच दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा क्रमांक लागतो, ज्याचा अंदाजित जीडीपी २४.३७ लाख कोटी रुपये (२९३.६ अब्ज डॉलर्स) आहे. भारताच्या केंद्र सरकारचे केंद्रस्थान असल्याने, दिल्लीला व्यापक सार्वजनिक क्षेत्राच्या कार्याचा फायदा होतो. त्याच वेळी, विस्तृत एनसीआर प्रदेशाने माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, आरोग्यसेवा आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये मजबूत पाया विकसित केला आहे. प्रशासन आणि खाजगी उद्योगांच्या या संतुलित मिश्रणामुळे दिल्ली एनसीआर देशातील सर्वात आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली क्षेत्रांपैकी एक म्हणून कायम राहिले आहे.

 

 

कोलकाता: पूर्व भारतातील व्यापार आणि औद्योगिक केंद्र

 

सुमारे १२.४५ लाख कोटी रुपये (१५० अब्ज डॉलर्स) सकल देशांतर्गत उत्पादनासह (जीडीपी) कोलकाता शहराचा तिसरा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालची राजधानी असलेले हे शहर, हुगळी नदी आणि कोलकाता बंदराच्या सान्निध्यामुळे, फार पूर्वीपासूनच एक महत्त्वाचे व्यापार आणि औद्योगिक केंद्र राहिले आहे. पारंपरिक उद्योग महत्त्वाचे असले तरी, हे शहर आपला आर्थिक पाया वैविध्यपूर्ण करत आहे, ज्यामुळे भारताच्या पूर्वेकडील अर्थव्यवस्थेत एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून त्याची भूमिका अधिक मजबूत होत आहे.

 

 

बंगळूर: तंत्रज्ञानाचे वाढीचे इंजिन

 

भारताची 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून जगभरात ओळखले जाणारे बंगळूर, २०२५ मध्ये सुमारे ११० अब्ज डॉलर्सच्या अंदाजित सकल देशांतर्गत उत्पादनासह (GDP) चौथ्या स्थानावर आहे. शहराचे माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवांमधील वर्चस्व, तसेच भरभराटीला आलेल्या स्टार्टअप परिसंस्थेमुळे, ते जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांसाठी एक आकर्षक केंद्र बनले आहे. तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, एरोस्पेस आणि इलेक्ट्रॉनिक्ससारखे क्षेत्र, मोठ्या आणि कुशल तरुण मनुष्यबळाच्या पाठिंब्याने, बंगळूरच्या आर्थिक स्थितीला अधिक मजबूत करतात.

 

 

चेन्नई: उत्पादन क्षेत्रातील सामर्थ्य

 

वरील शहरांमध्ये चेन्नईचा पण समावेश आहे, ज्याचा अंदाजित जीडीपी सुमारे ७८.६ अब्ज डॉलर्स आहे. भारताच्या आग्नेय किनारपट्टीवर वसलेले हे शहर एक प्रमुख उत्पादन केंद्र आहे, विशेषतः ऑटोमोबाईल आणि संबंधित उद्योगांसाठी. येथील विस्तृत बंदरांची पायाभूत सुविधा व्यापार आणि निर्यातीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्रात चेन्नईचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते.

 

चीनने केले कौतुक तर रशियाकडून मिळाले फार महत्त्वाचे गिफ्ट

 

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, भारतानं जपानला मागे टाकलं आहे, एका सरकारी प्रसिद्धी पत्रकानुसार भारताचा जीडीपी सध्या स्थितीमध्ये 4.18 ट्रिलियन अमेरीकन डॉलवर पोहोचली आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर आता भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. दरम्यान असा देखील अंदाज लावला जात आहे की, भारत 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. दरम्यान यावरूनच आता चीनने भारताचं जोरदार कौतुक केलं आहे.

 

 

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका आणि भारतामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. मात्र दुसरीकडे या टॅरिफनंतर भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. तर त्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर गेले होते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यांपासून भारताची चीन आणि रशियासोबत निर्यात देखील वाढली आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनने अमेरिकेचा निषेध देखील केला होता, भारतीय वस्तूंचं आमच्या देशात स्वागत आहे, असं चीनने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनकडून भारताचं जोरदार कौतुक करण्यात आलं आहे. चीनच्या दूतावासाकडून एक अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये चीनने असं म्हटलं आहे की, आम्हाला हे पाहून खूप आनंद झाला, की भारत हा जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. हीच भारताची खरी ताकद आहे, असं चीनने म्हटलं आहे.

 

 

दरम्यान, रशिया आता भारताला आणखी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. भारताच्या हवाई संरक्षणाला अधिक मजबूत करण्यासाठी आता रशियाने भारताला S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली देण्याची तयारी दर्शवली आहे. रशिया भारताला केवळ S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणालीच उपलब्ध करून देणार नाही तर तिचं तंत्रज्ञान देखील हस्तांतरीत करणार आहे. रशिया भारताला S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. हे एक अत्याधुनिक मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे, रशिया या हवाई संरक्षण प्रणालीचं तंत्रज्ञान देखील भारताला देणार आहे, कारण त्यामुळे या संरक्षण प्रणालीचे काही भाग हे भारतात बनवणे शक्य होणार आहे. रशियाकडून मिळणारी S-350 वित्याज हवाई संरक्षण प्रणाली भारत सध्या जी हवाई संरक्षण प्रमाणी वापरत आहे, तिच्यासोबत मिळून भारताच्या हवाई संरक्षणाला अधिक मजबूत करणार आहे. यामुळे आता अमेरिकेचं आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. रशिया आणि भारतामध्ये वाढत असलेली जवळीक हा कायमच अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय राहिला आहे. रशिया आणि भारतामध्ये जवळीक वाढू नये, असं अमेरिकेला वाटतं, मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर रशिया आणि भारताची जवळीक आता आणखी वाढली असून, रशियाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. रशियाकडून भारताला हवाई संरक्षण प्रणाली मिळणार आहे. पुतिन यांच्या दौऱ्यानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🖤 Sex Dating. Add >>> yandex.com/poll/43o224okZdReGRb1Q8PXXJ?hs=876f0f11aa76d21a19a520acf2ab7822& Request # PYRE9732723 🖤 03-01-2026 06:44:25

xthxs1


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती