भारत आहेच ‘सोने की चिडिया’! जगात खळबळ, GDP पेक्षा जास्त सोन्याचा खजिना भारतीय घरांत!!
xtreme2day
29-12-2025 17:42:26
576390721
भारत आहेच ‘सोने की चिडिया’! जगात खळबळ, GDP पेक्षा जास्त सोन्याचा खजिना भारतीय घरांत!!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 4,500 डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. परिणामी, भारतीय घरांमध्ये सोन्याचे एकूण मूल्य 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे, जे भारताच्या संपूर्ण सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपीपेक्षा जास्त आहे. भारतीयांच्या घराघरात अंदाजे 25,000 ते 30,000 टन सोने असल्याचा अंदाज आहे, जो जगातील सर्वात मोठा खाजगी साठा असेल. तसेच सध्याच्या किंमतीनुसार या सोन्याचे मूल्य सुमारे 3.4 ट्रिल्यन डॉलर ते 4.1 ट्रिल्यन डॉलर आहे. अशाप्रकारे, भारतीयांसाठी सोनं कौटुंबिक मालमत्तेतील एक लक्षणीय घटक असून हा प्रचंड साठा भारतीय संस्कृती, बचत आणि गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे आजही महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट करतो.
आश्चर्य म्हणजे मार्केटबाबत टिप्पणी करणाऱ्या तज्ज्ञांनी देखील त्यावेळी भारताचे फॉरेक्स रिझर्व्ह आणि व्यापारातील तूट यावर सोने खरेदीच्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली होती. पण त्यावेळी या आयातीमुळे जी दीर्घ-कालीन संपत्ती निर्मिती झाली, त्याची कल्पना केली नव्हती. विशेष म्हणजे ही वाढ भारताच्या सध्याच्या परकीय चलन साठ्यापेक्षा जास्त असून यामधून मालमत्तेचा संग्राहक म्हणून सोन्याची असामान्य भूमिका दिसून येते. 2011 पासून भारताने आयात केलेल्या सोन्याच्या साठ्याचे एकूण वर्तमान मूल्यांकन 1.6 ट्रिल्यन डॉलरच्या जवळपास आहे, तर फक्त 2024 मध्ये आयात केलेल्या सोन्याचे मूल्य त्यावेळी 52 बिलियन डॉलर होते, जे आता 108 बिलियन डॉलरएवढे झाले आहे.
2011 ते 2024 या कालावधीत भारताने मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली असून सुरुवातीला या आयातीमुळे व्यापारातील तूट वाढली पण या संपत्तीचे डॉलरमधील मूल्य नाट्यमयरित्या वाढले आहे. सध्या सोन्याचा भाव 4,211 डॉलर प्रती औंसवर उसळला असताना या काळात आयात केलेल्या सोन्याचे मूल्य अंदाजे 1.085 ट्रिल्यन डॉलर किंवा सुमारे 175% वाढले आहे.
2026 च्या सुरुवातीला भारतीय गुंतवणूकदार चढ-उताराच्या आर्थिक स्थितीत सोने आपले धोरणात्मक महत्त्व टिकवून ठेवण्याची अपेक्षा करू शकतात.किंमतीतली अस्थिरता अपरिहार्य आहे, पण सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व, ग्लोबल मॅक्रोइकॉनॉमिक डायनॅमिक्स आणि त्याचे प्रचंड संचित मूल्य याची खातरजमा करतात की, सोने संपत्ती संरक्षण आणि पोर्टफोलिओ विविधीकरणाचा महत्त्वाचा घटक बनून राहील. पारंपरिक होल्डिंग्जच्या बरोबरच आधुनिक गुंतवणूक उत्पादनांचा उपयोग केल्याने गुंतवणूकदार जोखमीचे व्यवस्थापन करता करता इष्टतम परतावा मिळवू शकतील.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.