Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

नववर्षानिमित्त रेल्वे प्रवाशांना खास भेट, पुणे-नागपूर मार्गावर धावणार विशेष गाड्या

xtreme2day   29-12-2025 17:38:54   4053844

नववर्षानिमित्त रेल्वे प्रवाशांना खास भेट, पुणे-नागपूर मार्गावर धावणार विशेष गाड्या

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - नववर्षानिमित्त रेल्वे प्रवाशांना खास भेट, पुणे-नागपूर मार्गावर धावणार विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नागपूर-हडपसर-नागपूर तसेच पुणे-नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे.

 

 

प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास सुरक्षित, आरामदायी करता यावा, यासाठी नागपूर-हडपसर-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या 8 फेऱ्या होणार असून, गाडी क्रमांक 01221 नागपूर-हडपसर विशेष एक्स्प्रेस ही विशेष गाडी सोमवार, बुधवार व शुक्रवारला नागपूर येथून सायंकाळी 19.40 वाजता सुटेल. शनिवार 27 डिसेंबर, सोमवार 29 डिसेंबर, बुधवार 31 डिसेंबर आणि शनिवार 3जानेवारीला दुसऱ्या दिवशी दुपारी 11.25 वाजता हडपसर पुणे येथे पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 01222 हडपसर-नागपूर विशेष एक्स्प्रेस ही विशेष रेल्वेगाडी मंगळवार, गुरुवार व शनिवारी हडपसर येथून दुपारी 15.50 वाजता सुटेल. 28 डिसेंबर (रविवार), 30 डिसेंबर (मंगळवार),1 जानेवारी 2026), ४ जानेवारी २०२६ला (रविवार) दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, पाचोरा, बेलापूर, अहमदनगर व दौंड कॉर्ड लाइन हे थांबे देण्यात आले आहेत. 

 

 

गाडी क्रमांक ०१४१९ पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेस शनिवार, सोमवार व बुधवार रोजी पुणे येथून रात्री २०.३० वाजता सुटेल. २७डिसेंबर (शनिवार), २९ डिसेंबर (सोमवार), ३१ डिसेंबर २०२५ (बुधवार) व ३ जानेवारी २०२६ (शनिवार) ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १४.०५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२०-नागपूर-पुणे विशेष एक्स्प्रेस रविवार, मंगळवार व गुरुवार रोजी नागपूर येथून सायंकाळी १६.१० वाजता सुटेल. २८ डिसेंबर (रविवार), ३० डिसेंबर (मंगळवार), १ जानेवारी २०२६ (गुरुवार) व ४ जानेवारी २०२६ (रविवार) ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ११.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा व अजनी येथे थांबे देण्यात आले आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🫦💦 Adult Dating. Confirm -- yandex.com/poll/43o224okZdReGRb1Q8PXXJ?hs=7de3e588ea914c838f6571fa7cbfd3cf& Reminder # ANTZ0155579 🫦💦 03-01-2026 06:44:10

9q3he2


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती