xtreme2day 25-12-2025 19:45:25 25098844
2030 पर्यंत रस्ते अपघाताचे मृत आणि जखमीचे प्रमाण 50 टक्क्यांवर आणणार - ना.नितीन गडकरी अलिबाग (विशेष प्रतिनिधी) - देशातील रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्यानां 25,000 रुपयाचे रोख बक्षीस मिळेल यापूर्वी हे बक्षीस 5000/-रुपये होते व मदत करणारे "मदतवीर"असा किताब मिळेल. या योजनेत अपघातानंतरच्या सुवर्ण काळात सामान्य लोकांना मदतीसाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करणे हा भाग करणे हा भाग असुन यापूर्वी बक्षीस 5000 रुपये काही भागात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आली होती ,आता ती संपूर्ण देशभरात लागु करण्यात आली आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणी महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सभेत सांगितले. या योजनेत अपघातग्रस्तांना उपचारास विलंब होउ नये व कुटुंबास तातडीने पैशाची व्यवस्था करावी लागणार नाही,उपचाराचा खर्च सरकार थेट करणार आहे.तसेच एखादे वाहन खडयात पडल्यास नवीन रुग्णवाहिकेत विशेष उपकरणे असतील त्यामुळे 10 मिनिटात तात्काळ मदत होईल. रस्ता अपघाता नंतर रुग्णालयात दाखल केल्यावर पहिल्या 7 दिवसा साठी प्रति व्यक्ती 1लाख, 50 हजार रुपयांपर्यंत चे कॅशलेस उपचार उपलब्ध असतील. या नवीन योजनेमुळे 2030 पर्यंत अपघातील मृत्यु आणी जखमीचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असुन यासाठी कठोर वाहन सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणी महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सभेत सांगितले. याबाबत लाखो नागरिकास आपत्तीव्यवस्थापन चे प्रशिक्षण दिलेले रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले ,या महत्वपूर्ण निर्णयानुसार अपघातग्रस्तांना जनता मदत करेल. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.