Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

महाराष्ट्राने बाजी मारली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्या भेटीत मोठी घोषणा, मायक्रोसॉफ्ट राज्यात १७.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

xtreme2day   12-12-2025 20:34:25   947052704

महाराष्ट्राने बाजी मारली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्या भेटीत मोठी घोषणा, मायक्रोसॉफ्ट राज्यात १७.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची करणार गुंतवणूक 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्या भेटीत महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली. मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. या निधीचा वापर AI, क्लाउड आणि डेटा सेंटरसारख्या पायाभूत सुविधांसाठी केला जाईल. भारताच्या AI-युक्त भविष्यासाठी हेच हवे होते, असे नडेला म्हणाले. या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांची ही विनंती सत्या नडेला यांनी मान्य केल्याचे स्पष्ट केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत लवकरच मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला यांच्यात आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मायक्रोसॉफ्टने मुंबईसह महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या मिळतील.  या बैठकीत महाराष्ट्राला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) हब बनवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. गुन्हे नियंत्रण, आरोग्यसेवा, शिक्षण, आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये AI को-पायलटचा वापर कसा करता येईल, यावरही सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टसोबत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून गुन्हेगारी नियंत्रणाचे उदाहरण सत्या नडेला यांच्यासमोर मांडले. महाराष्ट्राला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) हब बनवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. गुन्हे नियंत्रण, आरोग्यसेवा, शिक्षण, आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये AI को-पायलटचा वापर कसा करता येईल, यावरही सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टसोबत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून गुन्हेगारी नियंत्रणाचे उदाहरण सत्या नडेला यांच्यासमोर मांडले. 

 

याशिवाय, ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे ६ एकर जागेवर २० लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार २० वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच ३०,००० हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (#MMRDA) व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी १०० टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार, एमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार

 

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार 20 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मोठ्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत जागतिक स्तरावर विश्वास  दृढ झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्याबरोबरच, स्थिर आणि सक्षम वातावरण पुरवण्यास राज्य शासन तत्पर आहे.

सदर प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच 30,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार  बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी 100 टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे.

2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे.

ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी  अंकुर गुप्ता म्हणाले , “आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही उभारत आहोत.   मुंबईत करण्यात आलेली गुंतवणूक आता 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. उच्च दर्जाची, शाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी ब्रुकफिल्ड कटिबद्ध आहे.”

ब्रुकफिल्ड ही भारतातील सर्वात मोठ्या कार्यालयीन मालक आणि ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून देशातील सात शहरांमध्ये सुमारे 55 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते. उच्च दर्जाच्या, ग्रेड-A प्रकल्पांची विकास व संचालन क्षमता कंपनीने सातत्याने सिद्ध केली आहे. पवईतील प्रस्तावित प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, सामाजिक सुविधा व मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती