Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा, जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याची दिली ग्वाही

xtreme2day   11-12-2025 22:00:51   198325286

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा, जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याची दिली ग्वाही

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर दीर्घ चर्चा झाली. दोन्ही राष्ट्र प्रमुखांनी भारत-अमेरिका व्यापक जागतिक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रत्येक क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केल आहे. 

 

 डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया हँडलवरुन दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत उत्तम संवाद झाला. आम्ही द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय घटनाक्रमांवरही आम्ही चर्चा केली. भारत आणि अमेरिका जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी सोबत येऊन काम करत राहतील, अशी ग्वाही मोदींनी दिली आहे.

 

 

दोन्ही नेत्यांचं द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी संयुक्त प्रयत्न कायम ठेवण्यावर  एकमत झालं. COMPACT (Catalyzing Opportunities for Military Partnership, Accelerated Commerce & Technology) लागू करण्यासाठी क्रिटिकल टेक्नॉलॉजी, ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षेसह अन्य प्राधान्य क्षेत्रांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. प्रत्येक क्षेत्रातील सहकार्य, सहयोग सातत्यानं वाढत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान बोलून दाखवलं. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध घटनांवरही चर्चा झाली. दोन्ही देशांसमोर असलेली आव्हानं एकत्रितपणे परतवून लावण्यासंदर्भात विचारांचं आदानप्रदान झालं. दोन्ही देश संयुक्त हितांसाठी काम करत राहतील. या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येईल, असा निर्धार दोघांनी व्यक्त केला.

 

 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन गेल्याच आठवड्यात भारतात आले होते. त्यांचा भारत दौरा ३० तासांचा होता. रशियानं युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा होता. भारत रशियाकडून खनिज तेल खरेदी करत असल्यानं ट्रम्प यांनी भारतावर भरभक्कम टॅरिफ आणि दंड लावलेला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले असताना पुतीन भारत दौऱ्यावर आले. यानंतर आठवड्याभरात मोदी-ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच फोनवरुन चर्चा झाली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती