Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक; सत्या नडेला यांनी घेतली PM मोदींची भेट

xtreme2day   10-12-2025 22:38:40   853087350

मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक; सत्या नडेला यांनी घेतली PM मोदींची भेट

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत मायक्रोसॉफ्टने भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याद्वारे एआय हब उभारले जाणार आहे. 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी, भारतात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्ये तयार करण्यासाठी 17.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही मायक्रोसॉफ्टची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. यामुळे भारताला प्रथम एआय बनण्यास मदत होईल असं नडेला यांनी म्हटले आहे.

 

 

पंतप्रधान मोदी यांनी नडेला यांच्यातील यंदाची ही दुसरी भेट आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही या दोघांची भेट झाली होती. पंतप्रधानांच्या भेटीनंतर नडेला यांनी सोशल मीडियावर पोस् करताना म्हटले की, आम्हाला एआय क्षेत्रात भारतासोबत काम करायचे आहे. भारताला एआय-फस्ट बनवण्यासाठी आणि विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी मी मी उत्सुक आहे.’ दरम्यान, सत्या नडेला सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. स्टीव्ह बाल्मर यांच्यानंतर 2014 मध्ये त्यांनी सीईओ पद स्वीकारले होते. त्यानंतर जॉन डब्ल्यू. थॉम्पसन यांच्यानंतर ते 2021 मध्ये मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बनले. यापूर्वी ते मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एंटरप्राइझ ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती