Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

भारत आणि रशियादरम्यान आरोग्य, शिक्षण, अन्न धान्य सुरक्षा, फर्टिलायझर, टपाल सेवा, शिपिंग, कामगार आणि ट्रान्सपोर्ट या सारख्या मोठ्या करारांचा समावेश

xtreme2day   05-12-2025 22:26:53   268094382

भारत आणि रशियादरम्यान आरोग्य, शिक्षण, अन्न धान्य सुरक्षा, फर्टिलायझर, टपाल सेवा, शिपिंग, कामगार आणि ट्रान्सपोर्ट या सारख्या मोठ्या करारांचा समावेश

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये बैठक पार पडली, या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भारत आणि रशियाच्या 23 व्या शिखर परिषदेमध्ये पुतिन यांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. पुतिन यांचा भारत दौरा अशावेळी होत आहे, ज्यावेळी रशिया आणि भारतामधील द्विपक्षीय संबंध एक-एक ऐतिहासिक माईलस्टोन पार करत आहेत. गेल्या आठ दशकांमध्ये जगभरात अनेक चढ उतार पहायला मिळाले, मानवतेला अनेक आव्हानं आणि संकटांचा सामना करावा लागला आहे. मात्र हे सर्व होत असताना देखील भारत आणि रशियाची मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ राहिली आहे. एकमेकांचा सन्मान आणि विश्वासावर ही मैत्री टिकलेली आहे, ही मैत्री काळाच्या कसोटीवर नेहमीच खरी ठरली आहे, असं यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

 

आज हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यामध्ये जवळपास दीड तास बैठक झाले. यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. यामध्ये आरोग्य, शिक्षण, अन्न धान्य सुरक्षा, फर्टिलायझर, टपाल सेवा, शिपिंग आणि ट्रान्सपोर्ट या सारख्या करारांचा समावेश आहे. भारत आणि रशियादरम्यान कामगारांसंदर्भात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारांतर्गत आता भारतातील लोकांना कामासाठी रशियाला जाता येणार आहे, यामुळे काही प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न कमी होण्याची शक्यता आहे.

 

 

पंतप्रधान मोदींनी या करारामुळे दोन्ही देशांमधील आयात-निर्यात वाढणार असल्याची माहिती दिली. तसेच या करारांमुळे भारताच्या मेक इन इंडिया मिशनला बळ मिळणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ’15 वर्षांपूर्वी 2010 मध्ये दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक करार झाला होता. गेल्या अडीच दशकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दोन्ही देशांतील नाते सातत्याने पुढे नेले आहे. त्यांच्या नेतृत्वात चांगल्या-वाईट अशा दोन्ही परिस्थितीत दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. माझे मित्र पुतीन यांचे, भारताप्रती असलेल्या सकारात्मक नात्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.’  ‘ऊर्जा सुरक्षा हा भारत-रशियातील व्यापाराचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. नागरी अणुऊर्जेतील दशकांपूर्वीचे सहकार्य आमच्या स्वच्छ ऊर्जा गरजांना पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण राहिले आहे. आम्ही पुढेही हे सहकार्य चालू ठेवू. जगभरातील सप्लाय चैन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या खनिजांमधील आमचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पुढे बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘जहाजबांधणीबाबत झालेल्या करारात मेक इन इंडियाला आणखी बळकटी देण्याची क्षमता आहे. हे आमच्या विन-विन सहकार्याचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे, जे रोजगार, कौशल्ये आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देईल.’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘भारत आणि रशिया युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत लवकरात लवकर एफटीए अंतिम होणार आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवण्याला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर स्वाक्षरी झाली आहे. आता भारत रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांसाठी मोफत ई-टूरिस्ट व्हिसा सुरू करणार आहे अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. 

 

 

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी त्यांची भूमिका आहे. मात्र भारताची रशियाकडून तेलाची खरेदी सुरू आहे. त्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे. रशियाकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात कितीही अडचणी आल्या तरी तेल पुरवठा कायम सुरूळीत सुरू राहिलं असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, म्हणून अमेरिकेकडून दबाव निर्माण केला जात आहे, मात्र आता पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे, मात्र भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे, दुसरीकडे रशियानं देखील भारताला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरलवर मोठी सूट देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता, त्यानंतर आता पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा करण्यात आली आहे, हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🩲 Adult Dating. Let's Go >> yandex.com/poll/LZW8GPQdJg3xe5C7gt95bD?hs=2a7505d1c1f24226faf89ddcf8f13433& Message № 5724 🩲 10-12-2025 07:11:00

1e8fxy


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती