Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताची निर्यात अधिक स्पर्धात्मक; निर्यात वाढणार, उच्च टॅरिफचा प्रभाव कमी करणार, डॉलर आता भारतीय चलनात जास्त रक्कम आणणार

xtreme2day   04-12-2025 22:48:47   8957198

रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताची निर्यात अधिक स्पर्धात्मक; निर्यात वाढणार, उच्च टॅरिफचा प्रभाव कमी करणार, डॉलर आता भारतीय चलनात जास्त रक्कम आणणार

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताची निर्यात अधिक स्पर्धात्मक होईल, ज्यामुळे उच्च अमेरिकन शुल्काचा काही परिणाम कमी होईल. ऑक्टोबर 2025 मध्ये रुपयाचा REER म्हणजे वास्तविक प्रभावी विनिमय दर गेल्या वर्षीच्या 107.27 वरून 97.47 पर्यंत घसरला, जो भारतीय चलन अतिमूल्यांकित वरून अवमूल्यांकित कडे वळल्याचे दर्शवितो. यामुळे निर्यातीला फायदा होईल आणि स्वस्त चिनी आयातीवर अंकुश येईल. सततच्या व्यापार असमतोलाला तोंड देण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. 

 

 अमेरिकन डॉलरच्या समोर भारतीय चलन, रुपयाची घसरण थांबता थांबेना झाली आहे. यावर्षी रुपया आशियाई चलनांपैकी सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन बनले असून बुधवारी, आज, 4 डिसेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाने सर्वात कमी पातळी गाठली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 28 पैशांनी घसरून 90.43 वर आला, जो आदल्या दिवशी, बुधवारी, 90.15 वर बंद झाला असून 2025 मध्ये आतापर्यंत रुपया 5.5 टक्क्यांनी घरंगळला आहे.

 या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 85.70 वर होता, जो आता नव्वदी पार पोहोचला आहे. रुपयाच्या घसरणीचा अर्थ असा आहे की भारतात आयात करणे महागतील आणि परदेशात प्रवास व शिक्षण देखील महाग होतील. डॉलर निर्देशांक कमकुवत झाला असताना रुपयात झडती होत आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय देखील सतत प्रयत्नशील असून रुपयाच्या घसरणीची अनेक कारणे आहेत, ज्यात भारतीय बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचे सतत पैसे काढणे, वाढती व्यापार तूट, भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत विलंब आणि अनिश्चितता आणि जगभरातील भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता यांचा समावेश आहे. रुपया घसरल्यामुळे सर्वप्रथम कच्च्या तेलाच्या आयातीसाठी होणारा खर्च वाढेल. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती किंचित कमी झाल्या असल्या तरी, रुपया कमकुवत होतो तेव्हा तेल खरेदी करण्यासाठी जास्त रुपये खर्च येतो. याशिवाय भारत खतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे रुपया कमजोर झाल्यामुळे खतांच्या अनुदानाचा भार वाढेल. म्हणूनच, हे क्षेत्र रुपयाच्या हालचालींबाबत खूप संवेदनशील आहे.

 

घसरत्या रुपयाचे नुकसान

दुसरीकडे, परदेशात शिक्षण घेण्यासाठी डॉलरची किंमत तशीच राहील, पण रुपया कमकुवत होत असल्याने खरेदी करण्यासाठी अधिक रुपये लागतील. परिणामी शैक्षणिक कर्जाची रक्कम आणि ईएमआय वाढेल. तसेच आयात केलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढू शकते, जे सध्या चिंतेचे कारण असून रुपयाची घसरण थांबत नसल्यामुळे शेअर मार्केटमध्येही अस्थिरता दिसू शकते. त्याचवेळी सोने-चांदी, परदेशातून कर्ज घेणे, महागड्या कार आणि इलेक्ट्रिक वाहने, स्मरफोन्स व स्मार्टफोन, टीव्ही आणि एसी सारख्या अनेक व्हाईट गुड्ससाठी पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागेल. 

 

रुपयाच्या घसरणीमुळे होणारे नुकसान सामान्य लोकांच्या खिशाशी संबंधित आहेत. पण दुसरीकडे, काही फायदेही आहेत ज्यांची चर्चा क्वचितच केली जाते. घसरत्या रुपयामुळे भारतीय निर्यात वाढेल. परदेशात भारतीय वस्तू स्वस्त झाल्यामुळे विक्री आणि मागणी वाढेल, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था व जागतिक बाजारातील विश्वासार्हता वाढेल. याशिवाय, देशाला उच्च शुल्कापासून काही प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच इतर अनेक गोष्टीचाही फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणारा असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मोठा फायदा होईल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
😛 Dating for sex. Let's Go - yandex.com/poll/LZW8GPQdJg3xe5C7gt95bD?hs=0701162643b3d5bc332a4b82860c1748& ticket № 1726 😛 10-12-2025 07:10:53

u76ihc


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती