ब्लादिमीर पुतीन भारत भेटीवर येत असल्याने पाकिस्तान, चीन यांना थेट व अमेरिकेला अप्रत्यक्ष संदेश!
xtreme2day
03-12-2025 22:18:55
402533032
ब्लादिमीर पुतीन भारत भेटीवर येत असल्याने पाकिस्तान, चीन यांना थेट व अमेरिकेला अप्रत्यक्ष संदेश!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी संबंध तोडण्यासाठी भारतावर ना ना प्रकारचा दबाव टाकला. आता थेट पुतीनच भारत भेटीवर येत असल्याने पाकिस्तान, चीन यांना थेट व अमेरिकेला अप्रत्यक्ष संदेश दिला जात आहे, असे जागतिक स्तरावर नोंदवले गेले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. संरक्षण करारांच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा आहे. पुतिन यांच्या भारत भेटीत भारत आणखी S-400 सिस्टिम विकत घेणार की, त्यापुढचं व्हर्जन S-500 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदीचा करार होणार हा प्रश्न आहे. फायटर जेट्स, अन्य विमानं, ड्रोन्स आणि क्रूझ मिसाइल्स S-400 सिस्टिमद्वारे नष्ट करता येतात. S-500 सिस्टिम त्यापुढे जाऊन लांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाइल्स आणि हायपरसोनिक मिसाइल्सही नष्ट करु शकते. सध्या हायपरसोनिक मिसाइल रोखणारी जगातील एकमेव सिस्टिम म्हणजे S-500 आहे. चीन आणि पाकिस्तान सारखे देश हे तंत्रज्ञान मिळवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे S-500 भविष्यासाठी तरतूद ठरेल.
भारताने चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स रणनितीला एकदम कडक उत्तर दिलं आहे. चीनला जे होईल असं वाटलं नव्हतं ते भारताने केल आहे. रशियन संसद ड्यूमाने अलीकडेच भारत-रशियामधील एका महत्वाच्या सैन्य कराराला मंजुरी दिली आहे. या कराराचं नाव RELOS (रिसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट) एग्रीमेंट आहे. या करारानुसार, दोन्ही देशांचं सैन्य गरजेनुसार परस्परांची जमीन, एअरबेस, समुद्री बंदर आणि सैन्य सुविधांचा वापर करु शकेल. ही डील चीनसाठी एक मोठी रणनितीक चिंता आहे. या कराराचा महत्वाचा पैलू हा आहे की, भारताला आता रशियाच्या मध्य आशियाई सैन्य ठिकाणांपर्यंत पोहोचता येईल. रशियाचे तजाकिस्तान, किर्गिस्तान आणि कजाकिस्तान येथे सैन्य तळ आहेत. हे सैन्य तळ चीनची तिन्ही महत्वाची रणनितीक क्षेत्र अक्सु, कासगर आणि यिनिंगच्या भरपूर जवळ आहेत. या भागात चीन मोठ्या प्रमाणात तेल आणि शस्त्रास्त्रांच उत्पादन करतो.
आतापर्यंत चीनने पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आणि म्यानमार पर्यंत पोहोचून भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. RELOS कराराद्वारे भारत चीनच्या पश्चिमी सीमा क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे चीनला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल. चीनची स्ट्रिंग ऑफ पर्ल्स ही भारताला हिंद महासागरात घेरण्याची रणनिती आहे. RELOS कडे त्याचं उत्तर म्हणून पाहिलं जात आहे. भारताला आता यूरेशियाई जमिनीवरुन चीनच्या हालचालींवर नजर ठेवता येईल. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स चीनची ती रणनिती आहे, त्यानुसार ते हिंद महासागर क्षेत्रातील देशांमध्ये बंदरं आणि तळांचं नेटवर्क उभारुन भारताची घेराबंदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.