Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

हिंदू संपला तर जग संपेल; हिंदू समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शक - सरसंघचालक मोहन भागवत

xtreme2day   22-11-2025 19:27:45   575063787

हिंदू संपला तर जग संपेल; हिंदू समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शक - सरसंघचालक मोहन भागवत

 

मणिपूर (विशेष प्रतिनिधी) - भारत हे एका अमर समाज, अमर सिविलायजेशनच नाव आहे. बाकी आले, चमकले आणि निघून गेले. या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला आहे. आपण आताही आहोत आणि राहणार. कारण आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यामुळे हिंदू समाज राहणार. हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही. कारण हिंदू समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शन करत असतो. हे आपलं ईश्वर प्रदत्त कर्तव्य आहे” असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता, समाज आणि राष्ट्र शक्ती याचा उल्लेख केला. या दरम्यान मोहन भागवत म्हणाले की, “आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यात हिंदू समाज राहणार. जर हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही” “परिस्थितीचा विचार सर्वांना करावा लागतो. परिस्थिती येते-जाते. जगातील सगळ्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आली. काही देश त्यात समाप्त झाले. यूनान, इजिप्त आणि रोम सगळे संपले” असं भागवत म्हणाले.

 

प्रत्येक समस्येचा अंत शक्य आहे. त्यांनी नक्षलवादाचं उदहारण दिलं. जेव्हा समाजाने ठरवलं की, हे सहन करायचं नाही, तेव्हा हे संपलं” “ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्याचा अस्त नाही व्हायचा. पण भारतात त्यांच्या सूर्यास्ताची सुरुवात झाली. त्यासाठी आपण 90 वर्ष प्रयत्न केले. 1857 ते 1947. दीर्घकाळ स्वातंत्र्यासाठी आपण लढत होतो. तो आवाज कधी आपण दबू दिला नाही. कधी आवाज कमी झाला, कधी वाढला. पण तो आवाज दडपू दिला नाही” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

 

मोहन भागवत यांनी आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर भर दिला. देशाने कधी कोणावर अवलंबून राहू नये. “आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही डिपेंडेंट असता कामा नये. आपल्याकडे इकोनॉमिक एबिलिटी, मिलिट्री एबिलिटी आणि नॉलेज एबिलिटी असली पाहिजे. ती वाढली पाहिजे. देश सुरक्षित, समृद्ध राहिला पाहिजे. कुठलाही नागरिक दु:खी, दरिद्री आणि बेरोजगार राहू नये हे आपलं लक्ष्य पाहिजे. सगळ्यांनी देशासाठी काम करुन आनंदात रहावं” असं मोहन भागवत म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती