Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

पुणे ग्रँड टूर २०२६’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३५ देशांच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मान्यता

xtreme2day   20-11-2025 20:42:21   89864105

पुणे ग्रँड टूर २०२६’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३५ देशांच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मान्यता

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) -पुणे येथे १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी ३५ देशांच्या प्रतिनिधींच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून तत्त्वत: ना हरकत देण्यात आली आहे. 

 

यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्या माध्यमातून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकल संघटना अर्थात युसीआय युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलची (युसीआय) मान्यता मिळाली असून त्यांच्या दैनंदिनीत समाविष्ट करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेत भारतासह अल्बानिआ, अल्जेरिया, अमेरिकन समोआ, ऑस्ट्रेलिया, बहारिन, बल्गेरिया, बुर्किना फासो, चीन, झेक रिपब्लिक, इस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, गुआम, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मलेशिया, मालदीव्ज, मंगोलिया, मोरोक्को, नेदरलँड्स, नायजेरिया, फिलीपीन्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, स्वीडन, स्वीत्झर्लंड, थायलंड, युनायटेड अरब एमिरातस्, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांच्या नामांकन केलेल्या खेळाडू, प्रतिनिधींच्या सहभागाला तत्त्वत: ना हरकत देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांडून सायकलिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या महासचिवांना देण्यात आले आहे.

 

आयोजकांकडील निमंत्रण पत्र, व्हिजा विषयक नियमांचे पालन आणि आवश्यक तेथे संबंधित यंत्रणांच्याकडून मान्यता मिळण्याच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तत्त्वत: ना- हरकत दिल्याने स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटूंचा सहभाग वाढेल आणि उत्तम सायकलपटूंचे कौशल्य पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती