'धिस चॅलेंज एक्सेप्टेड'! नरेंद्र मोदींचं लक्ष्य आता बंगाल; तृणमूलच्या 'वाघीणीशी' करणार थेट सामना!
xtreme2day
19-11-2025 18:24:09
568672484
'धिस चॅलेंज एक्सेप्टेड'! नरेंद्र मोदींचं लक्ष्य आता बंगाल; तृणमूलच्या 'वाघीणीशी' करणार थेट सामना!
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - बिहार विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बंगाल हे पुढील लक्ष्य असल्याचं जाहीर केलं आहे. बंगालमध्ये भाजपाला आजवर कधीही सत्ता मिळालेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत बंगाल जिंकण्याचं ध्येय त्यांनी नवी दिल्लीत झालेल्या विजय सभेत जाहीर केलं आहे.
तिकडे राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी मोदींवर टीका करताना म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल जिंकण्याची, बंगालवर कब्जा करण्याची भाषा करत आहेत, जणू बंगाल त्यांच्या बायोडाटामध्ये जोडण्यासाठी आणखी एक जमीनीचा तुकडा आहे." तर पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी तर, "बंगालची वाघीण त्यांची वाट पाहत आहे." या शब्दात पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. तर पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर तृणमूल काँग्रेस (TMC) कडून तातडीने प्रतिक्रिया उमटल्या. पश्चिम बंगालच्या मंत्री शशि पांजा यांनी पंतप्रधानांना 'भ्रमात' न राहण्याचा सल्ला देत, बंगालमध्ये भाजपचा विजय 'असंभव' असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहिला तर, त्यांना अशा आव्हानांची सवय आहे, इतकेच नव्हे तर त्यांनी प्रत्येक आव्हान अतिशय यशस्वीपणे पेलले आहे. आव्हान स्वीकारून ते पूर्ण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. बंगालच्या आव्हानाकडे पाहण्याआधी, पंतप्रधान मोदींनी मागील काही वर्षांत यशस्वीरीत्या पेललेली काही मोठी आव्हाने लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, ज्यात विरोधकांनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत आव्हान दिलं होतं. बिहार निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांनी "बिहारला बाहेरील शक्ती नियंत्रित करू देणार नाहीत, बिहार बिहारीच चालवेल," असे आव्हान दिले होते. राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान मोदींना 'घाबरट' असे संबोधून टीका केली होती. परंतु, पंतप्रधान मोदींनी हे आव्हान स्वीकारले आणि प्रचारात "नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए बिहारमधील सर्व जुने विक्रम तोडण्यासाठी तयार आहे" असा विश्वास व्यक्त केला. झालेही तसेच; एनडीएने या विधानसभा निवडणुकीत इतिहास रचला. "बिहारला जंगलराजपासून मुक्ती देऊ" हा शब्द पंतप्रधान मोदी यांनी खरा करून दाखवला आणि त्यांनी जाहीर केलेले लक्ष्य साधले. दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांनी 2023 साली विधानसभेत म्हंटलं होतं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी या जन्मात दिल्ली जिंकू शकत नाहीत." निवडणूक प्रचारातही त्यांनी "आम्हाला हरवण्यासाठी तुम्हाला आणखी एक जन्म घ्यावा लागेल," असे आव्हान दिले होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.