Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

बिहारच्या निकालामुळे पश्चिम बंगालच्या विजयाचा रस्ता मोकळा झाला -पंतप्रधान नरेंद्र मोदी

xtreme2day   14-11-2025 21:49:24   573268902

बिहारच्या निकालामुळे पश्चिम  बंगालच्या विजयाचा रस्ता मोकळा झाला -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे पश्चिम बंगालमध्ये जंगल राज आम्ही हटवणार आहोत एवढेच नव्हे तर आमच्या विजयाचा रस्ता मोकळा झालेला दिसून येत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार निवडणुकीच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमात नवी दिल्ली येथे स्पष्टपणे सांगितले. बिहारच्या जनतेने दिलेला कौल हा सत्याचा कौल आहे असे ते म्हणाले, महिला आणि युवा या नवीन MY समीकरणाची नांदी बिहारच्या राजकारणात दिसून आली असेही ते आपल्या भाषणात म्हणाले. 

भाजपप्रणित एनडीएला बिहारमध्ये प्रचंड मोठं यश आलं आहे. या यशानंतर दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेचे मनापासून आभार मानले. तसेच नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना मोलाचं आवाहन केलं आहे. निवडणूक आयोगाकडून बिहारमध्ये मतदारयाद्यांबाबत जे काम सुरु आहे त्यामध्ये मदत करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला.

 

बिहारमध्ये यावेळी दोन टप्प्यांच्या निवडणुकीत कुठेही पुन्हा मतदान घेण्याची वेळ आली नाही. यावेळी अतिशय शांतपूर्ण वातावरणात मतदान झालं. त्यामुळे मी निवडणूक आयोग, निवडणुकीसोबत जुळलेले सर्व कर्मचारी, सुरक्षा दल, बिहारचे जागृत मतदार अशा सर्वांचे अभिनंदन करतो. देशाला तुमच्या सर्वांवर गर्व आहे. हे मी गर्वाने सांगू इच्छितो, बिहारच्या निवडणुकीने एक आणखी बात सिद्ध केली आहे, देशाचा तरुण मतदाता मतदार यादीच्या शुद्धीकरणाला गंभीरतेने घेत आहे. बिहारच्या मतदारांनी मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणासाठी जबरदस्त पाठिंबा दिला आहे. लोकशाहीच्या पवित्रतेसाठी प्रत्येक मतदाराचं महत्त्व असतं. त्याचा तो अधिकार असतो. आता प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे की, त्यांनी पोलिंग बुथवर आपापल्या पक्षांना सक्रिय करावं आणि मतदारयादीच्या शुद्धीकरणाच्या कामात उत्साहाने जुळावं. या कार्यात आपलं शंभर टक्के योगदान द्यावं. जेणेकरुन बाकी ठिकाणी देखील मतदारयाद्यांचं शुद्धीकरण होऊ शकेल", असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.

 

बिहार ती धरती आहे ज्या ठिकाणी भारताला लोकशाहीची जननी होण्याचा गौरव दिला आहे. आज त्याच धरतीने लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या ताकदीला धूळ चारली आहे. बिहारने पुन्हा एकदा दाखवलं आहे की, खोट्याचा पराभव होतो. जनविश्वासाचा विजय होतो. जामीनवर असणाऱ्या लोकांना जनता साथ देणार नाही, हे बिहारने ठळकपणे सांगितलं आहे", भारत आता खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे. जिथे प्रत्येक कुटुंबासा समानता, सन्मान आणि संधी मिळत आहे. जिथे आता तृष्टीकरणाची कोणतीच जागा नाही, पण तृष्टीकरणाची जागा संतुष्टीकरणाने घेतली आहे. हा सर्वात मोठाव मान आहे. भारताच्या लोकांना आता वेगात विकास हवा आहे. भारतीयांची विकसित भारत बनवण्याची इच्छा आहे", बिहारच्या भूमीत आता पुन्हा कधी जंगलराज येणार नाही. आजचा विजय बिहारच्या माता, भगिनींची आहे ज्यांनी जंगलराजचा आतंग सहन केला आहे. हा विजय बिहारच्या तरुणाचा आहे ज्याच्या भविष्याला काँग्रेस आणि लाल झेंड्यावाल्यांच्या दहशतीने बरबाद केलं. आता ते दिवस इतिहास बनले आहेत. बिहार विकासाच्या रस्त्याने पुढे धावत आहे. आता ही यात्रा थांबणारी नाही",असा दावा मोदींनी केला.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती