Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ; 13 ठार 30 जखमी, पुणे-मुंबईसह प्रमुख शहरातही हायअलर्ट जारी

xtreme2day   10-11-2025 22:45:29   298320431

 दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ; 13 ठार 30 जखमी, पुणे-मुंबईसह प्रमुख शहरातही हायअलर्ट जारी 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटात एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या कारने लगेच पेट घेतला व शेजारील दोन ते तीन इतर वाहनांनाही आग लागली. या आगीत तीन ते चार वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 30 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत. तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपास 200 ते 300 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू गेला. तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गाड्यांचे फक्त सांगाडे उरले आहेत. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती