परदेशातही दिवाळीचा उत्साह, 18 राज्यांचे नागरिक एकवटले,फेस्टिव्हल ऑफ लाईफ
xtreme2day
23-10-2025 20:37:53
295732416
परदेशातही दिवाळीचा उत्साह, 18 राज्यांचे नागरिक एकवटले,फेस्टिव्हल ऑफ लाईफ

मुंबई (सांस्कृतिक प्रतिनिधी) - भारतीय संस्कृती आणि परंपरेचा इतिहास असणाऱ्या दिवाळी सणानिमित्त सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतातील विविध राज्यांच्या नागरिकांनी दिवाळीच्या निमित्ताने एकत्रित येऊन फेस्टिव्हल ऑफ लाईफ साजरा केला.
सौदी अरेबियात राहणारे भारतीय नागरिक सलग दुसऱ्या दिवशी फेस्टिव्हल ऑफ लाईफ (FOL) या नावाने दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र आले. भारताच्या 18 राज्यांतील 1600 हून अधिक जणांनी या उत्सवात सहभाग घेतला. फेस्टिव्हल ऑफ लाईफ सलग दुसऱ्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 150 हून अधिक कलाकारांनी संगीत, नाट्य, नृत्याच्या माध्यमातून परंपरेची झलक दाखवली. कथकली, कुचिपुडी, ओडिसी, भरतनाट्यम, गरबा यासारखे विभिन्न प्रांतांचे नृत्याविष्कार सादर झाले.
भारतातील विविध राज्यांचे खाद्यपदार्थ चाखता यावेत, यासाठी विशेष खाद्य स्टॉल लावण्यात आले होते. तर कला जोपासण्यासाठी काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मूळ राजस्थानी असलेल्या आणि नंतर गुजरात आणि मुंबईत राहिलेल्या 65 वर्षीय प्रीती मिश्रा यांनी अन्य राज्यांच्या संस्कृती, लोकनाट्य आणि नाटकाचा आनंद घेणं अविस्मरणीय असल्याचं सांगितलं.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.