xtreme2day 04-10-2025 21:39:36 495605075
अंतराळात 'कॉस्मिक चॅनल' नावाचा एक अद्भुत मार्ग ; हा 'चोर दरवाजा' ब्रह्मांडाच्या समजुतींना आव्हान देत नवीन जगाचे दार उघडू शकतो ! अंतराळात 'कॉस्मिक चॅनल' नावाचा एक अद्भुत मार्ग सापडला आहे. हा मार्ग आपल्या सौरमंडळाला दूरच्या तारे आणि आकाशगंगेशी जोडतो, जो 'लोकल हॉच बबल' मध्ये आहे. सुपरनोवामुळे तयार झालेला हा 'चोर दरवाजा' ब्रह्मांडाबद्दलच्या आपल्या समजुतींना आव्हान देत नवीन जगाचे दार उघडू शकतो, असे या संशोधनातून समोर आले आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या संशोधकांनी ब्रह्मांडाच्या मार्गाचा शोध लावला आहे. हा मार्ग आपल्या सौरमंडळाला खूप लांबच्या तारे आणि आकाशगंगेशी जोडतो. म्हणजेच अंतराळात संशोधकांना एका अर्थाने चोर दरवाजा सापडला आहे. हा दरवाजा दुसऱ्या जगात मानवाला नेण्यास मदत करणार आहे. या छुप्या मार्गामुळे आतापर्यंतच्या ज्या मान्यता होत्या, त्याला धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या मान्यता या चुकीच्या होत्या हे या नव्या संशोधनातून उघड झालंय. तसेच ब्रह्मांडाला समजण्यासाठी अजून खोलवर विचार केला पाहिजे, हे ही स्पष्ट झालं आहे. सौरमंडळाच्या दूरच्या तारे आणि आकाशगंगांना जोडणाऱ्या या ब्रह्मांडिय रस्त्यामुळे ब्रह्मांडाला समजून घेण्यास मदत मिळणार आहे. जगात कुठे ना कुठे काही ना काही संशोधन सुरू असतं. खास करून मानवाला इतर ग्रहावर राहता येईल का? मनुष्य अमर होईल का? मनुष्य मेल्यावर कुठे जातो? त्याचं काय होतं? अशा असंख्य गोष्टींवर संशोधन सुरू असतं. पण आता शास्त्रज्ञांना एक मोठा शोध लागला आहे. सर्वचजण अचंबित होतील असा हा शोध आहे. आपलं सौरमंडळ अंतराळात ज्या खास ठिकाणी आहे, त्याला अनेक वर्षापासून लोकल हॉच बबल म्हटलं जातं. या परिसरातील तापमान सर्वाधिक आहे. तसेच येथील घनत्वही अत्यंत कमी आहे. हा संपूर्ण परिसर 300 लाइट ईयरमध्ये पसरलेला आहे. सुपरनोवाच्या ताकदीने तो बनला आहे. येथील जोरदार धमाक्यांमुळे आसपासच्या गॅसला उष्ण केले आहे. त्यामुळेच हा परिसर थोडासा काळोखमय आणि अत्यंत उष्ण बनला आहे. अत्यंत पातळ अशा प्लाज्माच्या रुपाने या उष्णतेच्या निशाणी या ठिकाणी अस्तित्वात आहेत. हा परिसर रिकामा वाटत असला तरी या ठिकाणी प्रत्येक काळात काही ना काही घडामोडी घडल्या आहेत, असं संशोधनाचे लेखक डॉ. एल एल साला यांचं म्हणणं आहे. या अभ्यासातून कॉस्मिक चॅनलचा लागलेला शोध हा सर्वात महत्त्वाचा शोध होता. संशोधकांनी या चोर दरवाजाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते हा रस्ता सेंटॉरस तारामंडळ (Centaurus constellation)च्या परिसरात फैलावलेला आहे. गर्भ बुडबुड्याच्या मधून हा रस्ता जातो. कदाचित आपल्या सौरमंडळाला खूप दूरच्या तारे आणि आकाश गंगेशी हा रस्ता जोडतो. असा आणखी एक मार्ग कॅनिस मेजर नावाच्या तारामंडळाशी जोडलेला असू शकतो, असंही संशोधकांना वाटतं. सुपरनोवा या संपूर्ण कामात महत्त्वाची भूमिका बजावतो. तो फुटल्यावर त्यातून पदार्थ आणि ऊर्जा बाहेर फेकली जाते. त्यामुळे ताऱ्यांच्या मधली जागा गरम होते. त्यामुळे हालचाल वाढते. अनेक लाखो वर्षापासून ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणच्या घनत्व, तापमानात वारंवार बदल येत असतो. यावरून स्पेस ही काही रिकामी जागा नाहीये. तर या ठिकाणी एक जटिल वातावरण आहे.
uv883p
79ghoz
mvf9z3