xtreme2day 01-10-2025 22:22:23 458623626
GCC महाराष्ट्र राज्याचे भाग्य बदलणार! जगभरातून गुंतवणूक वाढणार, रोजगाराचा महापूर येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - राज्य सरकारने GCC पॉलिसी मान्य केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. Global Capability Centre म्हणजे परदेशातील बड्या MNCs च्या मदतीने आर्थिक प्रगती साधणे. या जीसीसीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढण्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. या संस्थेच्या मार्फत जागतिक कंपन्या राज्यात गुंतवणूक करतील आणि त्याआधारे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. गेल्यावेळी पीपीओंनी राज्यात गुंतवणूक वाढवली आणि रोजगार उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे जीसीसी आधारे राज्यात रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्रींनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी निकषांचे गाठोडे बाजूला ठेवण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. इतकेच नाही तर मदतीसाठी राज्य सरकार तात्काळ पुढाकार घेणार आहे. त्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट पाहत थांबणार नाही, असा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यासमोर निर्सगानं आव्हान उभं केलं असलं तरी राज्य सरकारने मदतीसाठी सीमोल्लंघन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर GCC धोरणामुळे रोजगाराचा महापूर येणार आहे. येत्या काळात जगभरातून भारतात 5000 GCC येतील. यातील अधिकाधिक कंपन्या राज्याकडे वळवण्यासाठी राज्य सरकारने जीसीसी पॉलिसीला मान्यता दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यामुळे राज्यात दोन टप्प्यात अधिक पगाराचे, वेतन देणारे 5 लाख रोजगार निर्माण होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तर गुंतवणूक वाढेल आणि कंपन्या सुरू होतील. त्या कर देतील, त्यातूनही राज्याला मोठा महसूल मिळेल, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचे ते म्हणाले.
wbaz6b
gne64a
ck1g9j
vxpzxc