राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास दिव्य संस्कारांच्या अद्वितीय उदात्त, अलौकिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला अखंड प्रवाह - स्वामी अवधेशानन्द गिरी
xtreme2day
01-10-2025 22:06:38
789034714
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास दिव्य संस्कारांच्या अद्वितीय उदात्त, अलौकिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला अखंड प्रवाह - स्वामी अवधेशानन्द गिरी

नागपूर (विशेष प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण देशात उत्सव आणि गौरवाचे वातावरण आहे. शताब्दी वर्षे केवळ एक संघटनेच्या मैलाचा दगड नाही, तर भारतभूमीच्या आत्मा आणि सनातन संस्कृतीच्या जीवंत धारेचे प्रतिक आहे. या प्रसंगी सनातन धर्माच्या परंपरेचे वाहक श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रोत्रिय ब्राह्मणिष्ठ जुनापिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर अनंतश्री विभूषित पूज्यपाद श्री स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांनी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळ्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम चालणार आहेत. संघाने आतापर्यंत आलेल्या अनेक नैसर्गिक संकटात आपल्या स्वयंसेवकांची फौज उभी केली आहे. या संघाच्या शताब्दी सोहळ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष नाणे प्रकाशित करण्यात आले आहे. श्री स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांनी पाठवलेल्या संदेशात त्यांनी संघाच्या शताब्दीला केवळ संघटनेचा प्रवास मानले नाही तर तिचे राष्ट्रवादाची अखंड गाथा म्हणून वर्णन केले आणि संघाचे मार्गदर्शन भारत आणि जागतिक मानवतेसाठी मार्गदर्शक तत्व प्रतिपादीत केले आहे.
हे शताब्दी वर्षे केवळ कोणा संघटनेचा प्रवास नसून राष्ट्रधर्माची अखंड गाथा आहे. हा प्रवास दिव्य संस्कारांच्या हा एक अखंड, अद्वितीय आणि उदात्त अलौकिक सांस्कृतिक आध्यात्मिक अखंड प्रवाह आहे, ज्याने वैयक्तिक विकासाला राष्ट्र उभारणीचा मूलभूत मंत्र बनवले आहे. संघटनेची अजेय शक्ती, जीने विविधता आणि विभिन्नतांना एकात्मते परिवर्तित करुन सशक्त समर्थ भारताच्या स्वप्नांना साकार केले आहे. कल्याणकारी सेवांचा संकल्प, ज्याने संकटं, अपघात आणि महासाथीच्या प्रत्येक घडीत करुणा आणि सर्वतोभावेन समर्पणाने समाजाला आपले सर्वस्व अर्पण केले आहे. संघाच्या स्थापनेच्या वेळी भारत गोंधळलेला होता आणि गुलामगिरीच्या अंधारात बुडालेला होता.अशा वेळी परम पूज्य डॉ.हेडगेवार यांनी हे दाखवले की जर प्रत्येक हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली तर स्वराज्याचा सूर्य उदय होणे निश्चित आहे. तीच ज्योत आजही शाखांमध्ये स्वयंसेवकांच्या जीवनात आणि राष्ट्रचेतनेत प्रकाशित आहे. आज जेव्हा मानवतेची भौतिकतेची अंध शर्यत दिशाहीन होत असेल तेव्हा संघाचे “एकात्म मानव दर्शन” संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी पथप्रदर्शक आहे. हे दर्शन आपल्या स्मरण करते की धर्म केवळ पूजा -पद्धतीपर्यंत मर्यादित नाही, उलट समाज-कल्याण, चरित्र – निर्माण आणि राष्ट्र सेवेचा महान यज्ञ आहे.
“संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्” हा संघाच्या प्रत्यक्ष साधनेचा स्वर आहे. हा शताब्दी पर्वात आपण पुन:स्मरण करुयात की आता आपण सर्वत्र एकत्र चाललो, एकत्र विचार केला, आणि एक साथ संकल्प केला तर भारत भूमिचे स्वर्णिम भविष्य निश्चित रुपाने साकार होईल. हा शताब्दी सोहळा आपल्या सर्वांसाठी केवळ एकमात्र उत्सव नाही, तर दैवीय आव्हान आहे की आपण सर्व सनातन संस्कृतीचे संवाहक बना. “वसुधैव कुटुम्बकम्” च्या भावनेला जगासमोर सक्षम जीवितप्रमाण बनवून सादर करावे, आपल्या आचारणातून हे सिद्ध करावे की “सेवा ही परमो धर्मः” आहे. सनातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यात,राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात आणि सेवा, दान आणि परोपकारी प्रवृत्तींचा प्रसार करण्यात अहोरात्र गुंतलेल्या संघशक्तीच्या दिव्य प्रकाशाने उजळलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या अनंत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.