पत्रकारांनी आपली लेखणी समाज हितासाठीच वापरावी -प्रा.डॉ.जयपाल पाटील
मांउटअबु (प्रतिनिधी ) - आपण आपली लेखणी समाजाच्या हिता साठी वापरुन न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे आपल्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार संमेलनात सामिल होऊन आनंद घेऊन शांततेचा प्रसार करावा असे आवाहन भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केले.
प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनात मागील संमेलनातील अनुभव कथनात येथील सोलर प्रकल्प सर्वानी पहावा, कारण देशभरातील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहून प्रत्त्येक राज्यात करावा असे सुचविले होते.ते आपण स्टुडिओ च्या "दिलकी बात" मधे पहावे,त्याची अंमलबजावणी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी अयोध्या मंदिर उद्घाटन वेळी देशवासिना दिली व देशभरातील नामवंत पत्रकार, साहित्यिक यांचें मार्गदर्शन मिळुन आपल्या ज्ञानात वाढ या संमेलनामुळेहोते,पत्रकारांनी आपले वाहन कोणालाही देऊ नये, कारण वाहन परवाना नसेल आणी अपघात झाल्यास त्याचे परिणाम म्हणजे दंड आणी शिक्षेची व आकाशातील वीजेबाबत केंद्र सरकार ने दामिनी अँप तयार केला आहेतो डाऊनलोड करून घ्यावा म्हणजे आपण सुरक्षित जीवन जगु शकता अशी माहिती दिली,
या सत्राच्या अध्यक्षा बीके.ज्योती दिदी या होत्या.यावेळेस एआय व सोशलमिडीया वर श्री.बाबजी, हैदराबाद, श्री.नरेंद्र कौशिक, जयपुर, कु.अनोना अग्रवाल, दिल्ली, डॉ.जितेंद्र द्विवेदी, रायपूर, श्री.ओमकारसिंग गालहेर,श्री.मनोहर मनोज गाझियाबाद, डॉ.डी.जे.पाटील नोएडा याचे मार्गदर्शन झाले.प्रास्ताविक डॉ.कुंजन आचार्य उदयपुर, यांचे मार्गदर्शन झाले.सूत्रसंचालन दिल्लीच्या मिडीया विगच्या सुनिता दिदी यांनी केले.आभार प्रदर्शन बीके कर्मचंद मिडीया विंग मोहिली यांनी मानले. तर देश भरातील 1500 आलेल्या संपादक, पत्रकाराची निवास, भोजन व्यवस्था अतिशय उत्कृष्ट केल्या बद्दल संमेलनाचे राष्ट्रीय संयोजक बी.के. श्री.शंतनु यांच्या जनसंपर्क कार्यालयातील सहकार्याचे अभिनंदन केले. यावेळेस जेष्ठ पत्रकार आनंद जाधव, सौ.नीला खोत रमेश खोत,संचालक महाराष्ट्र कल्याण निधी,श्री.अशोक जोशी,संपादक समाज संवाद, डॉ.किशोर पाटील संपादक स्वराज्य तोरण,भिवंडी,इत्यादी व अनेक पत्रकार उपस्थित होते.