xtreme2day 27-09-2025 22:19:08 57305966
तामिळनाडू करुर येथे अभिनेते विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; 35 जणांचा मृत्यू, 130 जखमी चेन्नई (एजन्सी वार्ता) - दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि राजकीय नेते विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) या पक्षाच्या रॅलीमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. तामिळनाडूच्या करूर येथे आयोजित केलेल्या या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने वर्तवली आहे. अभिनेता विजय यांच्या सभेसाठी करूर येथे नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. याच मोठ्या गर्दीतून अचानक चेंगराचेंगरी झाली. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 3 मुलांसह किमान 10 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, परंतु स्थानिक माध्यमांनी आतापर्यंत एकूण 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्या अनेकांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या करूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) समाजमाध्यमावर पोस्ट करत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "करूरमधून आलेली ही बातमी अत्यंत चिंताजनक आहे." चेंगराचेंगरीमुळे बेशुद्ध झालेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री स्टालिन यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यन आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्रिची जिल्ह्यातील मंत्री अनबिल महेश यांनाही युद्धपातळीवर आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, त्यांनी एडीजीपी यांच्याशीही चर्चा केली असून, लवकरात लवकर परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
5jbxe7
aksi6u
whadas
xj0pr0