Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75व्या वाढदिवसानिमित्त जगातील अनेक देशांनी दिल्या शुभेच्छा !

xtreme2day   17-09-2025 23:49:18   395640631

पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75व्या वाढदिवसानिमित्त जगातील अनेक देशांनी दिल्या शुभेच्छा !

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा आज (17 सप्टेंबर 2025) 75वा वाढदिवसनिमित्त  देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल मोदींनी देखील समाज माध्यमांवरून ट्रम्प यांचे आभार मांडले आहेत.

 

या फोनवरील संभाषणामध्ये युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारांना पंतप्रधान मोदींकडून पाठिंबा ही देण्यात आल्याची माहिती आहे. तर तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, अशी पंतप्रधान मोदींनी भूमिका घेतलीय. तर यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका व्यापार करार आणि युक्रेन मुद्द्यावर देखील या निमित्याने चर्चा झाली आहे.

 

दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. ही बैठक सुमारे 7 तास चालली, जी दोन्ही देशांनी सकारात्मक असल्याचे वर्णन केले. अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, द्विपक्षीय व्यापार चर्चेवरील ही बैठक सकारात्मक होती.  याबाबत पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी त्यात लिहिले कि, "माझ्या मित्रा, राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या फोन कॉलबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी तुमच्या पुढाकाराचे आम्ही समर्थन करतो." असे मोदी या पोस्ट मध्ये म्हणाले आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती