Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ITI चे हजारो विद्यार्थी मिळून राज्यातील ७५० गावांमध्ये राबविणार स्वच्छता अभियान

xtreme2day   15-09-2025 22:40:15   1893466

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ITI चे हजारो विद्यार्थी मिळून राज्यातील ७५० गावांमध्ये राबविणार स्वच्छता अभियान 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने "स्वच्छता अभियान" राबविण्यात येणार आहे.

 

 राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येणार असून, तब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुक्यातील  गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे. या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी असून, उद्घाटन कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

 

या अभियानाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "विकसित भारताचा संकल्प साकार करण्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजेच स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ करण्याचा निर्धार आदरणीय पंतप्रधानांनी केला असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा केले आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागामार्फत आम्ही हा उपक्रम सुरु करत आहोत. स्वच्छता, आरोग्य या विषयांबाबत आजही जागृतीची गरज आहे आणि ती गरज या अभियानाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू."

 

प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वच्छ भारताच्या निर्धाराला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतातील पहिली संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकादमी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली असून, याद्वारे हजारो तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळत आहे. स्वच्छता आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे हे आपण जाणतोच, पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची आणि कुशल मनुष्यबळाची. या दोन्ही गोष्टींसाठी महाराष्ट्राचा कौशल्य विकास विभाग तत्परतेने पुढाकार घेत राहील असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
awlgeXTficCU 16-09-2025 12:58:16

xtreme2day.com
KkRGgghwbGnqx 16-09-2025 13:22:59

xtreme2day.com
keMNrEcKoL 16-09-2025 13:53:22

xtreme2day.com
kQfARCtbbNYBsM 17-09-2025 02:40:28

xtreme2day.com
🔗 📥 Balance Alert: 1.1 BTC detected. Secure transfer => https://graph.org/Get-your-BTC-09-11?hs=5d44ac1593850e6d9ba0c074de56c05d& 🔗 17-09-2025 15:33:47

eefleu

xtreme2day.com
gnlrldQLf 17-09-2025 16:55:00


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती