येणाऱ्या नवीन GST नुसार बदल सुरू ; देशातील बड्या FMCG कंपनीकडून उत्पादनांच्या दरात कपात जाहीर, नागरिकांना दिलासा
xtreme2day
14-09-2025 22:11:30
19560490
येणाऱ्या नवीन GST नुसार बदल सुरू ; देशातील बड्या FMCG कंपनीकडून उत्पादनांच्या दरात कपात जाहीर, नागरिकांना दिलासा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - देशात नवे जीएसटी बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. त्याअगोदर भारतातील बड्या एफएमसीजी कंपनीकडून दरकपात जाहीर करण्यात आली आहे.
या होणाऱ्या बदलांमुळे ऑटो कंपन्यांपाठोपाठ आता एफएमसीजी कंपन्यांनी देखील आपल्या उत्पादनांच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) या भारतातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने डव शाम्पू, लाइफबॉय साबण, हॉर्लिक्स, कॉफी आणि इतर वस्तूंवर दर कमी करण्याची घोषणा केली आहे. 22 सप्टेंबरपासून ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे, कारण याच दिवसापासून सुधारित वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होणार आहे. कंपनीने विविध उत्पादनांवरील जीएसटी दर कपातीनंतर नवीन दर जाहीर केले आहेत आणि नवीन किमती असलेले स्टॉक लवकरच बाजारात उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतर जीएसटीमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. सध्या जीएसटी अंतर्गत 5%, 12%, 18% आणि 28% असे 4 स्लॅब आहेत, जे 22 सप्टेंबरपासून कमी करून फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब करण्यात आले आहेत. या मोठ्या बदलामुळे खाद्यपदार्थांपासून ते शैम्पू, टूथपेस्ट आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी घट होणार आहे, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. त्यामुळेच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने (HUL) आपल्या उत्पादनांच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.