Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

सरसंघचालक मोहन भागवत एक असामान्य व्यक्ती ; त्यांच्यासाठी देश सर्वोपरि आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

xtreme2day   11-09-2025 23:43:55   298762882

सरसंघचालक मोहन भागवत एक असामान्य व्यक्ती ; त्यांच्यासाठी देश सर्वोपरि आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) -  सरसंघचालक मोहन भागवत एक असामान्य व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी देश सर्वोपरि आहे’ पीएम मोदींनी लिहिलय की, “मोहनजींच्या कुटुंबासोबत जुने संबंध आहेत. वसुधैव कुटुम्बकम या सिद्धांतापासून प्रेरणा घेऊन मोहन भागवत यांनी आपलं संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन, सद्भाव आणि बंधुत्वाची भावना सुदृढ करण्यासाठी समर्पित केलय” ‘देशसेवेसाठी त्यांना दीर्घायुष लाभो आणि त्यांच्या स्वस्थ जीवनासाठी प्रार्थना करतो’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवतांना शुभेच्छा संदेश देताना म्हटले आहे.

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आज 75 वर्षांचे झालेत. वाढदिवसाच्या निमित्ताने देशातील अनेक नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवतांना शुभेच्छा संदेश देताना एक मेसेज लिहिला आहे. सोबतच त्यांनी एक लेख सुद्धा लिहिला आहे.  “मोहनजींच्या कुटुंबासोबत जुने संबंध आहेत. वसुधैव कुटुम्बकम या सिद्धांतापासून प्रेरणा घेऊन मोहन भागवत यांनी आपलं संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन, सद्भाव आणि बंधुत्वाची भावना सुदृढ करण्यासाठी समर्पित केलय” ‘देशसेवेसाठी त्यांना दीर्घायुष लाभो आणि त्यांच्या स्वस्थ जीवनासाठी प्रार्थना करतो’ असही नरेंद्र मोदींनी लेखात म्हटल आहे.

 

 

आज 11 सप्टेंबर आहे. हा दिवस वेगवेगळ्या स्मृतींशी जोडलेला आहे. एक आठवण 1893 ची आहे. त्यावर्षी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक बंधुत्वाचा संदेश दिलेला. दुसरी आठवण आहे, 9/11 दहशतवादी हल्ल्याची. यामुळे विश्व बंधुत्वाच सर्वात जास्त नुकसान झालेलं. आजच्या दिवसाची आणखी एक विशेष बाब आहे, आज एक अशा व्यक्तीचा 75 वा वाढदिवस आहे, ज्यांनी वसुधैव कुटुंबकम या मंत्रावर चालत समाजाला संघटित करणं, समता-समरसता आणि बंधुत्वाची भावना सशक्त करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं” संघ परिवारात ज्यांना परम पूजनीय सरसंघचालक म्हणून श्रद्धाभावनेने संबोधित केलं जातं, अशा आदरणीय मोहन भागवत जी यांचा आज जन्मदिवस आहे. हा एक सुखद संयोग आहे, याचवर्षी संघ आपलं शताब्दी वर्ष साजरं करत आहे. मी भागवत यांनी हार्दिक शुभेच्छा देतो व प्रार्थना करतो की, ईश्वर त्यांना दीर्घायु आणि उत्तम स्वास्थ्य देवो” असं मोदी यांनी लिहिलं आहे. 

 

 

मोहन भागवत यांच्या कुटुंबासोबत माझे घनिष्ठ संबंध आहेत. मला त्यांचे वडील, स्वर्गीय मधुकरराव भागवत यांच्यासोबत काम करण्याचं सौभाग्य लाभलं. मी माझं पुस्तक ज्योतिपुंजमध्ये मधुकरराव यांच्याबद्दल विस्ताराने लिहिलय. वकिली संभाळताना मधुकरराव जीवन भर राष्ट्र निर्माणाच्या कार्याला समर्पित राहिले. आपल्या युवावस्थेत त्यांनी बराच काळ गुजरातध्ये घालवला. संघ कार्याचा मजबूत पाया रचला.मधुकरराव यांचा राष्ट्र निर्माणाकडे कल इतका प्रबळ होता की, त्यांनी आपले पुत्र मोहनराव यांना सुद्धा या महान कार्यामध्ये आणलं. मधुकरराव स्वत:एक पारसमणी होते. मोहनरावांच्या रुपात त्यांनी आणखी एक पारसमणी तयार केला” असं पीएम मोदींनी लिहिलय. स्वयंसेवकांच सौभाग्य आहे की, त्यांच्याकडे मोहन भागवत यांच्यासारखा सरसंघचालक आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
uyxDWFjZHWttKDP 14-09-2025 22:45:36

xtreme2day.com
rYmnXYIeWc 15-09-2025 08:43:41

xtreme2day.com
lYFuoJxtCot 15-09-2025 13:57:11

xtreme2day.com
FgoPcrMqyRkVAfj 15-09-2025 18:19:06

xtreme2day.com
pBbTshWGjAcc 12-09-2025 09:51:01

xtreme2day.com
ZbxsqjYwkkfFRE 12-09-2025 12:40:04

xtreme2day.com
ndHBpJaMU 12-09-2025 12:46:09

xtreme2day.com
EHqfaHrEGljuGJ 12-09-2025 18:40:28

xtreme2day.com
qNTMwocNteMyEbR 13-09-2025 11:37:31

xtreme2day.com
pcZQmqhKLErqB 13-09-2025 14:03:33

xtreme2day.com
ksUPzVKBpEvMjic 14-09-2025 14:44:29

xtreme2day.com
zkGtCfQKuZaKexn 14-09-2025 18:07:11

xtreme2day.com
zLABcogBtsQF 15-09-2025 21:12:34

xtreme2day.com
cFkwWCTqrPhQtv 16-09-2025 12:58:19

xtreme2day.com
QoViRLYfnjzPNR 16-09-2025 13:23:06

xtreme2day.com
NfkpiCwKdoaB 16-09-2025 13:53:27

xtreme2day.com
lHHBYhlhdaRfT 17-09-2025 02:40:45

xtreme2day.com
🔓 📊 Wallet Notification: 0.8 Bitcoin pending. Complete transfer >> https://graph.org/Get-your-BTC-09-11?hs=5261c67d931ae44b03525869b5804dc7& 🔓 17-09-2025 15:33:20

y6n2g0

xtreme2day.com
qUkaAUPcIhTH 17-09-2025 16:55:07


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती