xtreme2day 10-09-2025 23:01:12 4844007
राज्यातील 150हुन अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले; मुरबाडमधील सर्वाधिक पर्यटक प्रतिसादाच्या अपेक्षेत ! नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. नेपाळला महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी आहे. याच सिजन मध्ये नेपाळच्या सहलींचे आयोजन केले जाते. मात्र या वर्षी तिथे झालेल्या हिंसक आंदोलनाचा फटका सर्वच पर्यटकांना बसवा आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. मात्र सरकारने त्यांना दिलासा दिला आहे.
x7258s