GEN Z या नेपाळमधील तरूणांनी केलेल्या आंंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांनी शरणागती पत्करली; नेपाळची अस्थिरता भारतासाठी धोक्याची घंटा !
xtreme2day
09-09-2025 23:00:17
450347001
GEN Z या नेपाळमधील तरूणांनी केलेल्या आंंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांनी शरणागती पत्करली; नेपाळची अस्थिरता भारतासाठी धोक्याची घंटा !

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, राष्ट्रपती आणि मंत्र्यांनी तरूणांच्या आंदोलनापायी राजीनामा दिला आहे. सध्या तेथे अस्थिरता निर्माण झाली आहे. शेजारी असल्याने आणि व्यापारामुळेही भारत या सगळ्यांपासून दूर राहू शकत नाही. त्याचा परिणाम भारतावरही होणार आहे.
नेपाळ मधील राजकीय अस्थिरतेचा फटका भारत ाला बसण्याची शक्यता आहे. नेपाळ आणि भारत यांचे संबंध खूप जवळचे आहेत. भारत अजूनही नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. नेपाळच्या एकूण व्यापारापैकी जवळपास दोन-तृतीयांश व्यापार भारतासोबत होतो. पण, नेपाळ भारताकडून जेवढी निर्यात करतो, त्यापेक्षा जास्त आयात करतो. नेपाळची ही स्थिती फक्त भारतासोबतच नाही, तर इतर देशांसोबतही आहे. यामुळे नेपाळची अर्थव्यवस्था कमजोर झाली आहे. त्यात आताच्या राजकीय संकटामुळे आणखी भर पडू शकते. अमेरिकेसोबतच्या तणावाच्या काळात भारतासाठी ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे भारताला व्यापारात दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
भारतासोबत नेपाळ सर्वात मोठा व्यापार करतो. त्यांच्या एकूण व्यापारापैकी जवळपास दोन-तृतीयांश व्यापार भारतासोबत होतो. पण, नेपाळ जेवढी निर्यात करतो, त्यापेक्षा जास्त आयात करतो. ही फक्त आकडेवारी नाही, तर नेपाळची आयात केलेल्या वस्तूंवरची जास्त अवलंबिता, त्यांच्या उद्योगांमध्ये स्पर्धा नसणे आणि करारांचा फायदा न घेता येणे, अशा अनेक समस्या आहेत. नेपाळच्या वस्तूंना भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र मिळायला वेळ लागतो, ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे सिमेंट, बूट, कपडे आणि सॅनिटरी उत्पादनांची निर्यात थांबली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात नेपाळने 164 पेक्षा जास्त देशांसोबत व्यापार केला. पण, त्यांचे बहुतेक देशांसोबत व्यापार तोट्यात आहे. आकडेवारीनुसार, नेपाळने फक्त 37 देशांसोबत व्यापार नफ्यात केला आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात त्यांना 1,527.09 अब्ज रुपयांचा तोटा झाला. नेपाळच्या व्यापारात अनेक अडचणी आहेत. एक काळ असा होता, जेव्हा नेपाळ कृषी उत्पादने निर्यात करणारा मोठा देश होता. पण, आता त्यांना तांदूळ, दूध आणि ऊस यांसारख्या गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागत आहे. नेपाळची कमजोर अर्थव्यवस्था असण्याचे कारण योग्य व्यापार धोरणे नाही.
नेपाळने भारतात 224.68 अब्ज रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या, तर भारताकडून 1,071.19 अब्ज रुपयांच्या वस्तू आयात केल्या. अमेरिकेसोबतच्या तणावामुळे भारताला निर्यात करण्यासाठी नवीन बाजारपेठ शोधावी लागत आहे. आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की भारत नेपाळला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतो. त्यामुळे नेपाळमधील राजकीय संकट भारतासाठी चांगले नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच सार्क संघटनेतील अजून एका देशात आलेल्या अराजकतेच्या परिस्थितीमुळे चिंतेंचे वातावरण आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी खनाल यांचा आंदोलकांनी जीवंत जाळल्याने मृत्यू झाला. नेपाळमधील हिंसक आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललं आहे. पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलक शांत व्हायला तयार नाहीत. आंदोलकांकडून जाळपोळ, दगडफेक सुरुच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमामात वित्तहानी झाली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.