नेपाळमध्ये तरुणाई उतरली रस्त्यावर ; आंदोलक पोहोचले चक्क संसदेवर, 28 जणांचा मृत्यू
xtreme2day
08-09-2025 19:57:00
18630630
नेपाळमध्ये तरुणाई उतरली रस्त्यावर ; आंदोलक पोहोचले चक्क संसदेवर, 28 जणांचा मृत्यू
काठमांडू (एजन्सी वार्ता) - नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुणाई आक्रमक झाली आहे. काठमांडूमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले. भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीचा निषेध करत हे आंदोलन हिंसक झाले. आंदोलनादरम्यान चौदा आंदोलकांचा मृत्यू झाला. नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह सव्वीस सोशल मीडिया अँप्सवर बंदी घालण्यात आली आहे. आंदोलकांनी संसद परिसरात दगडफेक केली आणि गाड्या व घरांच्या छतावर चढून निषेध व्यक्त केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले असून, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने 'शूट ऍट साईट' चे आदेश जारी केले आहेत.
या देशाचे पंतप्रधान आणि महत्त्वाच्या मंत्र्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. प्रशासनानुसार, "देश महत्त्वाचा आहे" म्हणून समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. तर आंदोलक आणि पत्रकारांचा दावा आहे की, सरकारने त्यांच्या विरोधातील आवाज आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्यासाठी ही बंदी घातली आहे.
आज दिवसभर नेपाळमध्ये सध्या एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बंदी घातलेल्या अॅप्लिकेशन्स आणि सोशल मीडियामुळे सुरू झालेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. तज्ञ अतुल कहाते यांच्या मते, ही परिस्थिती काही वर्षांपूर्वीच्या अरब क्रांतीच्या उलट आहे. अरब क्रांतीची सुरुवात चळवळीने झाली आणि सोशल मीडियाने तिला उचलून धरले, तर नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आल्याने निदर्शनं सुरू झाली आहेत. सोशल मीडिया आता केवळ वेळ घालवण्याचे माध्यम राहिलेले नसून, देशात काय सुरू आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या परिस्थितीला दोन्ही बाजू आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, जर कंपन्यांनी नोंदणी केली नाही आणि भविष्यात काही प्रश्न निर्माण झाले, तर त्याला कोण जबाबदार असेल? दुसरीकडे, आंदोलकांचे म्हणणे आहे की, दडपशाहीच्या नावाखाली ही माध्यमं बंद करणे हे कदाचित हुकूमशाहीकडे जाणारे वळण असू शकते. त्यामुळे नेमके कोण बरोबर आहे हे सांगणे अवघड आहे. आंदोलकांनी सोशल मीडियावरील बंदीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा मानले आहे.
काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनला हिंसक वळण लागलं. त्यामध्ये आतापर्यंत 28 युवकांचा मृत्यू झाला. काठमांडूमध्ये एकीकडे सध्या कर्फ्यु लावण्यात आला आहे, तर दुसरीकडे युवक अद्यापही माघार घेण्याच्या भूमिकेत नाहीत. त्यामुळे नेपाळमध्ये अनागोंदी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहेनेपाळमध्ये सध्या पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली एक CPN-UML आणि नेपाळी काँग्रेस असे आघाडीचे सरकार कार्यरत आहे. या सरकारवर चीनचा प्रभाव असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळेच देशातील तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.
या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या दोन मुख्य मागण्या आहेत -
पोलिस व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवावा.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी सोशल मीडिया बंदी उठवावी.
तरुणांच्या या मागण्यांना व्यापक पाठिंबा मिळत असून हे आंदोलन Gen-Z क्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.