Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

पुण्यातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा नवा रेकॉर्ड ; तब्बल 35 तासांचा विक्रम !

xtreme2day   07-09-2025 21:59:45   110458005

पुण्यातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा नवा रेकॉर्ड ; तब्बल 35 तासांचा विक्रम !

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील  गणेश विसर्जन मिरवणूक सुमारे 32 तास तर खंडित मिरवणूक तब्बल 35 तास चालली.  नटेश्वर घाटावर शेवटच्या गणपतीचे विसर्जन (अमरज्योत मिञ मंडळ, काशेवाडी) रविवारी रात्री 8. 15 वाजता झाले. साधारण मिरवणूक त्यामुळे यंदा रेकॉर्डब्रेक 35 तास चालली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीच सुक्ष्म नियोजन केलं होतं आणि २४ तासात मिरवणूका संपवणार अस सांगितले होते. मात्र, मानाचे पाच आणि बाकी महत्वाच्या मंडळांनी वेळा पाळल्या पण त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. 

 

 

शनिवारी दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी लवकर सुरु झालेल्या मिरवणुकीमुळे मानाचा पहिला कसबा गणपती - 3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती - 4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा तिसरा गुरुजी तालीम - 4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती - 4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती - 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं. श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे 9:23 वाजता म्हणजे 5 तास 23 मिनिटांनी विसर्जन झाले. तर भाऊ रंगारी गणपती मध्यरात्री 3 वाजता झाले. 

 

पुण्यामध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो ने विशेष अशी सोय ठेवली होती रात्रभर ही मेट्रो सुरू ठेवण्यात येणार होती त्यामुळे शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला इतका प्रतिसाद मिळताना दिसला आहे चक्क सगळे मेट्रो स्टेशन हे गर्दीने फुल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पिंपरी -चिंचवडमध्ये गणपती विसर्जनला गालबोट लागल्याची घटना घडली. लाडक्या गणरायाला निरोप देत असताना वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये चार युवक पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित दोन युवकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

 

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक आणि नेहमीच वेगळेपणा आणि सामाजिक संदेश देणाऱ्या ठरत असतात, नारायण पेठ मधील संयुक्त प्रसाद या मित्र मंडळाने यंदा विसर्जन मिरवणूक मध्ये कृषी गणेश या देखावा केला होता, शेतीकामासाठी वापरण्यात येणारी बैल गाडी, ट्रॅक्टर, विडा, खुरपे, बुजगावणे, फवारणी यंत्रे आदी साहित्य वापरून कृषी गणेश साकारला.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🔍 📥 Account Notification: 0.33 Bitcoin detected. Finalize reception >> https://graph.org/Get-your-BTC-09-11?hs=45e01070081b729288aca2a7a075ea81& 🔍 17-09-2025 15:32:10

557183


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती