भारत, रशिया, चीन यांना एकत्र असे दीर्घ आणि समृद्ध भविष्य लाभो! अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान !
xtreme2day
05-09-2025 19:03:08
76705472
भारत, रशिया, चीन यांना एकत्र असे दीर्घ आणि समृद्ध भविष्य लाभो ! अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान !

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - अमेरिकेने भारत आणि रशियासारखे महत्त्वाचे भागीदार गमावले आहेत. "असे दिसते आहे की आपण भारत आणि रशियाला 'अतिशय गूढ आणि अंध:कारमय' चीनमुळे गमावले आहे," असे त्यांनी आपल्या 'Truth Social' अकाउंटवर लिहिले आहे. तसेच भारत, रशिया, चीन यांना एकत्र एक दीर्घ आणि समृद्ध भविष्य लाभो!" असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारत आणि रशिया आणि चीन यांच्यातील वाढत्या जवळीकीबाबत ट्रम्प यांनी दिलेली ही सर्वात स्पष्ट सार्वजनिक कबुली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून भारताला चीनच्या वाढत्या वर्चस्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा मित्र मानत होती. 2019 मध्ये ह्यूस्टन येथील "हाउडी मोदी" रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत दिसले होते. त्याचबरोबर अमेरिकेने भारत जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग (Quad) पुन्हा सुरू केला होता. हा गट चीनच्या आव्हाचा सामना करण्यासाठीच केला होता, असं मानलं जात होतं.
अलीकडच्या काळात मात्र, युक्रेनमधील युद्ध आणि व्यापारासारख्या मुद्द्यांवर भारत आणि अमेरिकेच्या भूमिकांमध्ये असलेले मतभेद यामुळे ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळा टॅरिफ धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.