एस.जे.एफ. आय. राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र समितीत सामिल व्हा- राष्ट्रीय सचिव प्रा.डॉ.जयपाल पाटील
xtreme2day
29-08-2025 22:11:41
1987492
एस.जे.एफ. आय. राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र समितीत सामिल व्हा- राष्ट्रीय सचिव प्रा.डॉ.जयपाल पाटील
अलिबाग (प्रतिनिधी) - अखिल भारतीय स्तरावर ज्येष्ठ पत्रकाराच्या विविध मागण्यांबाबत संपुर्ण देशातील 200हुन अधिक ज्येष्ठ पत्रकार केरळात दाखल होउन संमेलनात राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संपूर्ण देशभरात समान पेन्शन, आरोग्य सुविधा,आणी ईतर मागण्या केंद्र सरकार कडुन घेण्यासाठी तिवरपुरम प्रेसिडेंट यांनी पुढाकार घेऊन कॉन्फरन्स घेतली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या ठिकाणी पत्रकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले अनेक ज्येष्ठ,विद्वान पत्रकार,लेखक कवी,समाज सेवक लाभले, यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष पदी दिल्ली येथील विद्वान, अभ्यासु लेखक, समीक्षक पत्रकार श्री.संदीप दीक्षित यांची,ऊपाध्यक्ष पदी गोवा श्रीमती सुहासिनी प्रभुगावकरयाची,सरचिटणीस पदी श्री.विजयकुमार तर महाराष्ट्रचे प्रा.डॉ.जयपाल यांची सचिव पदी आणी देशभरातील सर्व राज्यातील सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले आहेत.
या संघटनेचे अधिवेशन होताच केरळ सरकारने यासाठी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत जेष्ठ, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सहभागी होण्याची ईच्छा असेल त्यानी आपले पत्रकारितेतील परिचय पत्रात,आपले शिक्षण, अनुभव,संघटनात्मक,अनुभव पारपत्र नमूद करावे.अध्यक्ष श्री.संदीप दीक्षित यांचे नावे राष्ट्रीय सचिव प्रा.डॉ.जयपाल पाटील मो.9673727277/9270446777 यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.