Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

राजकीय नेत्यांच्या चुका दाखवून लोकशाही बळकट करण्याचे कार्य ज्येष्ठ पत्रकार करतात - मुख्यमंत्री पिनाराई विजयन

xtreme2day   22-08-2025 21:46:54   89034801

राजकीय नेत्यांच्या चुका दाखवून लोकशाही बळकट करण्याचे कार्य ज्येष्ठ पत्रकार करतात - मुख्यमंत्री पिनाराई विजयन

महाराष्ट्रातील रायगडच्या डॉ. जयपाल पाटील यांची ज्येष्ठ पत्रकार फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड

 

त्रिवेणपुरम केरळ (विशेष प्रतिनिधी) - जेष्ठ पत्रकार आपल्या लेखणीतून नागरिकांना सतर्क ठेवतात आणि राजकीय नेत्यांच्या चुका दाखवून लोकशाही बळकट करतात,” असे प्रतिपादन केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्रिवेनपुरम येथे झालेल्या जेष्ठ पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनात केले.

 

 

त्रिवेनपुरम,केरळ येथे भारतातील जेष्ठ पत्रकार संमेलन केरळ चे मुख्यमंत्री श्री.पिनारा ई विजयन यांचे हस्ते  द्वीप प्रजनन करण्यात आले.यावेळेस  ते म्हणाले जेष्ठ पत्रकाराच्या  अनुभवातून  नागरिकांना  आपल्या  लेखणीतून सतर्क करतात त्याच बरोबर आम्हास राजकिय नेत्यानां वेळ  पडली तर चुका दाखवण्यात कमी पडत नाहीत त्याबद्दल आपले अभिनंदन करुन केरळ  मधे देशभरातुन राष्ट्रीय संमेलनात आलात त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून सर्वाचे स्वागत करतो तसेच देशातील चौथ्या स्तंभाला केंद्र सरकारने समान  सुविधा  दिल्या पाहिजेत असें यांनी आपल्या उद्घाटन मार्गदर्शनात   सांगितले. 

 

 

केरला ज्येष्ठ पत्रकार फोरमने आयोजित केलेल्या राष्ट्रीय संमेलनात उत्कृष्ट  नियोजन करुन संपुर्ण देशातील  ज्येष्ठ पत्रकारांना देशव्यापी आरोग्य सेवा,आणीबंद असलेल्या रेल्वे योजनेत समाविष्ट करावेत.यासाठी नवनियुक्त पदाधिकारी आपल्या  मागण्याचे  निवेदन पंतप्रधानश्री.नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लवकरच देणार आहेत. यामधे राष्ट्रीय कार्यकारिणीत पदाधिकारी अध्यक्ष, संदीप दीक्षित- दिल्ली,उपाध्यक्ष-1) आनंदम पुलिपालुपुला-टेलेन्गाना2) श्री. 

सुहासिनी प्रभुगोंकर-गो3) डॉ. 

टी. जनार्डन -संध्रा4) चंद्र प्रकाश भारद्वाज -मध्य प्रदेश

सरचिटणीस 1)- एन. 

पी. 

चेक्कट्टी - केरळ, सचिव 1) के.संथाकुमारी -कर्नाटक 2) कान्हू नंदा -ओडिशा 3)आर.रंगराज-तामिळनाडू4) डॉ.जयपाल परशुराम पाटील - महाराष्ट्र1)

कोषाध्यक्ष - के. पी. 

विजयकुमार. केरळ कार्यकारी समितीत  1) आर. 

पी. संबंध दासिवा रेड्डी -कर्नाटक 2) जॉर्ज कॅलिव्हलिल - दिल्ली

3) एस. 

सबनयकन - पश्चिम बंगाल4) श्री. रिमा सरमा -सॅम 5)अभिजीतपाडे-बिहार.6)असवान कुमार -जम्मू काश्मीर7) उपेंद्र सिंह राठोड - राजस्थान 8) प्रदीप फुतेला - उत्तराखंड 9) सुमामा औसल - झारखंड

10) पी. 

परमेश्वारा रोआटेलेन्ना यांची  नियुक्ती करण्यात  आली.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार श्री.फ्रँक लुईस यांनी केले.या संमेलनात संपुर्ण देशातील 120 ज्येष्ठ पत्रकार सहभागी  झाले होते व त्यांची व्यवस्था अतिशय सुंदर केली होती.

 

त्रिवेनपुरम (केरळ) येथे झालेल्या जेष्ठ पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, “जेष्ठ पत्रकार अनुभवाच्या बळावर समाजाला सजग ठेवतात. त्यांच्या लेखणीतून लोकशाही अधिक सक्षम होते. त्यामुळे केंद्र सरकारने चौथ्या स्तंभाला समान सुविधा द्याव्यात,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केरळ ज्येष्ठ पत्रकार फोरमतर्फे आयोजित या संमेलनात महाराष्ट्राचे डॉ. जयपाल परशुराम पाटील यांची जेष्ठ पत्रकार फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी संदीप दीक्षित (दिल्ली), उपाध्यक्षपदी आनंदम पुलिपालुपुला (तेलंगणा), सुहासिनी प्रभुगोंकर (गोवा), डॉ. टी. जनार्डन (आंध्र प्रदेश) आणि चंद्रप्रकाश भारद्वाज (मध्य प्रदेश) यांची निवड झाली.

सरचिटणीसपदी एन. पी. चेक्कट्टी (केरळ), सचिवपदी के. संथाकुमारी (कर्नाटक), कान्हू नंदा (ओडिशा), आर. रंगराज (तामिळनाडू) आणि डॉ. जयपाल परशुराम पाटील (महाराष्ट्र) यांची निवड झाली. कोषाध्यक्ष म्हणून के. पी. विजयकुमार (केरळ) यांची निवड करण्यात आली. विविध राज्यांतील १० प्रतिनिधी कार्यकारी समितीत समाविष्ट झाले.

 

नव्या कार्यकारिणीने देशातील जेष्ठ पत्रकारांना आरोग्य सेवा आणि रेल्वे सवलतींचा लाभ देण्यासंबंधीचे निवेदन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर करण्याचा निर्णय घेतला. या संमेलनात देशभरातील १२० जेष्ठ पत्रकार सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार फ्रँक लुईस यांनी केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती