Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

दक्षिण विरुद्ध दक्षिण ; उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत

xtreme2day   19-08-2025 19:33:22   138532152

दक्षिण विरुद्ध दक्षिण; उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. भाजप प्रणित एनडीएनं सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर इंडिया आघाडीनं सुदर्शन रेड्डी यांनी संधी दिली आहे. राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे, तर रेड्डी आंध्र प्रदेशचे आहेत. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केलं होतं. पण महाराष्ट्रातून त्यांना मताधिक्क्य मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

 

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे मतदार असल्यानं राज्यातील सगळ्या खासदारांनी त्यांना मतदान करावं. विशेषत: मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. त्यांचा रोख शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे होता. राधाकृष्णन महाराष्ट्राचे असले तरीही त्यांना महाराष्ट्रातून मताधिक्क्य मिळणार नसल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं.

 

 

दरम्यान, राज्यात महायुतीचं सरकार असताना आपल्याकडे असलेल्या संख्याबळापेक्षा अधिकची मतं राधाकृष्णन यांना मिळावीत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून करण्यात येईल. त्यामुळे त्यांच्या गळाला किती खासदार लागतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनाही या निवडणुकीत मतदान करता येईल. ते राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य आहेत. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभेचा विचार करता ३७ खासदारांचं बळ आहे. तर महायुतीचा आकडा ३० च्या घरात जातो. त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे.गेल्याच आठवड्यात इंडिया आघाडीनं ३०० खासदारांचा मोर्चा काढला होता. मतचोरीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी एकी दाखवली होती. आता हीच एकी कायम राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती